कामगार साहित्य संमेलन
महाराष्ट्र शासनाने सन १९५३ मध्ये स्थापन केलेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून कामगार साहित्य संमेलने भरवण्यात येतात. या मंडळाच्या माध्यमातून आतापर्यंत १७ संमेलनांचे आयोजन करण्यात आले असून पहिले कामगार साहित्य संमेलन ९ व १० जानेवारी १९९२ रोजी पुणे येथे भरवण्यात आले होते. पहिल्या संमेलनाचे अध्यक्ष पद्मश्री नारायण सुर्वे तर उद्घाटक श्री मधु मंगेश कर्णिक होते. शेवटचे १७ वे कामगार साहित्य संमेलन २४ व २५ फेब्रुवारी २०२३ रोजी मिरज जि. सांगली येथे संपन्न झाले असून जेष्ठ साहित्यिका व लोक संस्कृतीच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर संमेलनाध्यक्ष तर डॉ राजा दीक्षित, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ हे उद्घाटक होते. तसेच महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री डॉ. सुरेशभाऊ खाडे हे स्वागताध्यक्ष तर महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे हे या साहित्य संमेलनाचे प्रमुख कार्यवाह होते.
यापूर्वी झालेली कामगार साहित्य संमेलने
- १ले : पुणे, १९९२, संमेलनाध्यक्ष - पद्मश्री नारायण सुर्वे
- २रे : नागपूर, १९९३,संमेलनाध्यक्ष - श्री बाबूराव बागूल
- ३रे : नाशिक, १९९४, संमेलनाध्यक्ष - डाॅ. आनंद यादव
- ४थे : सोलापूर, १९९५, संमेलनाध्यक्ष - डॉ. सदा कऱ्हाडे
- ५वे : औरंगाबाद, १९९६, संमेलनाध्यक्ष - श्री अरुण साधू
- ६वे :जळगाव, १९९७, संमेलनाध्यक्ष - श्री उत्तम बंडू तुपे
- ७वे : कोल्हापूर, १९९८,संमेलनाध्यक्ष - श्री शिवाजी सावंत
- ८वे : मुंबई, १९९९, संमेलनाध्यक्ष - पद्मश्री नामदेव ढसाळ
- ९वे : अकोला, २०००, संमेलनाध्यक्ष - डाॅ. विठ्ठल वाघ
- १०वे : चिपळूण, २००१, संमेलनाध्यक्ष - श्री मधु मंगेश कर्णिक
- ११वे : चिंचवड, २००४ संमेलनाध्यक्ष- प्रा.केशव मेश्राम
- १२वे : सोलापूर, २००५, संमेलनाध्यक्ष - डॉ. अनिल अवचट
- १३वे : अमरावती, २००६, संमेलनाध्यक्ष - श्री उत्तम कांबळे
- १४वे : नांदेड, २००७, संमेलनाध्यक्ष - श्री फ. मुं शिंदे
- १५वे : नाशिक, २००९, संमेलनाध्यक्ष- डॉ. रूपा कुलकर्णी
- १६वे : सातारा, २०११, संमेलनाध्यक्ष - श्री रामदास फुटाणे
- १७वे : मिरज, २०२३, संमेलनाध्यक्ष - डॉ. तारा भवाळकर