कापूरहोळ
?कापूरहोळ महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | भोर |
जिल्हा | पुणे जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड | • एमएच/ |
कापूरहोळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील एक गाव आहे.
पुणे सातारा हायवे (NH4)वर हे गाव आहे. धाराउमाता या गाडे घराण्यातील होत्या. आजही या गावात गाडे कुटूंब आहेत. या गावाच्या जवळ बालाजी मंदिर आहे व तेथुन जवळच पुरंदर गड आहे.
पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी कापूरहोळ गाव. इतिहास प्रेमींना परिचित. छत्रपती संभाजी महाराजाचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला. संभाजी महाराजांच्या मातोश्री सईबाई संभाजी महाराजांच्या जन्माच्यावेळी मरण पावल्या. तेंव्हा गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या कापूरहोळ गावातील कुलवंत गाडे पाटील घराण्यातील धाराऊ माता यांनी देखील बाळाला जन्म दिला होता. तान्ह्या शंभू राजास या गाडे कुटुंभातील धाराऊ या मातेने दूध पाजले. महाराष्ट्रातील इतिहासात धाराऊ मातेस विशेष महत्त्व आहे.
भौगोलिक स्थान
हवामान
येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १,००० मिमी पर्यंत असते.