Jump to content

कान्होपात्रा

कान्होपात्रा

जन्मइ.स.चे १५ वे शतक
मंगळवेढा, महाराष्ट्र
निर्वाणइ.स.चे १५ वे शतक
पंढरपूर, महाराष्ट्र
संप्रदायवारकरी संप्रदाय
भाषामराठी
साहित्यरचनाअभंग
संबंधित तीर्थक्षेत्रेपंढरपूर
विशेष माहितीमंगळवेढ्याच्या शामा नामक गणिकेची मुलगी पण पूर्वपुण्याई मुळे लहानपणापासूनच भक्तीरसात रममाण होती.

(हा लेख कान्होपात्रा या मराठी संत-कवयित्रीविषयी आहे; कान्होपात्रा या नाट्य-अभिनेत्रीसाठी कान्होपात्रा किणीकर उघडा).

सामान्य कुटुंबात जन्मालाआलेल्या आणि विठ्ठलभक्तिपर अभंगरचना करणाऱ्या कान्होपात्रा या इ.स.च्या १५ व्या शतकातील वारकरी संप्रदायातील एक महत्त्वाच्या संत कवयित्री होत्या.भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर जवळच्या मंगळवेढा येथे त्यांचे वास्तव्य होते. कर्नाटकातील बिदरच्या बादशहाने मागणी घातली म्हणून कान्होपात्रा यांनी पंढरपूरला विठ्ठलचरणी डोके ठेवून प्राण सोडले.

अभंग

कान्होपात्रा यांचे ३३ अभंग ’सकल संत गाथा’ या ग्रंथात समाविष्ट झाले आहेत.

चरित्र

  • कान्होपात्रा यांचे इ.स. १७७७मध्ये बसवलिंग यांनी लिहिलेले एक ओवीबद्ध चरित्र जानेवारी २०१५मध्ये सापडले आहे.
  • श्री संत कान्होपात्रा चरित्र (बाळकृष्ण लळीत)
  • विजय यंगलवार यांच्या 'भक्तीचा ध्वज उभारभाऱ्या महिला संत' या पुस्तकात कान्होपात्रावर एक प्रकरण आहे. इतर प्रकरणे जनाबाई, बहिणाबाई, मीराबाई, मुक्ताई यांच्यावर आहेत.

नाटक-चित्रपट

  • संत कान्होपात्रा (नाटक, १९३१, लेखक - ना.वि. कुलकर्णी; संगीत मास्टर कृष्णराव). या नाटकाचा पहिला प्रयोग १९ नोव्हेंबर १९३१ रोजी झाला होता.
  • कान्होपात्रा (चित्रपट, १९३७; दिग्दर्शक भालजी पेंढारकर)

संत कान्होपात्रा नाटकातील गाणी

  • अगा वैकुंठीच्या राया
  • अवघाचि संसार सुखाचा
  • अशी नटे ही चारुता
  • जोहार मायबाप जोहार
  • दीन पतित अन्यायी
  • देवा धरिले चरण
  • धाव घाली विठू आता
  • नुरले मानस उदास
  • पति तो का नावडे
  • पतित तू पावना
  • शर लागला तुझा गे