Jump to content

कानंदी नदी

कानंदी
उगम घिसर
पाणलोट क्षेत्रामधील देशपुणे जिल्हा, महाराष्ट्र
धरणे गुंजवणी (चापेट)

कानंदी ही महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्यातून वहाणारी एक नदी आहे.

पुणे जिल्ह्यातले कानंद मावळ म्हणजे कानंद नदीचे खोरे. याच मावळात तोरणा किल्ला आहे. कानंद मावळ हा पुणे जिल्ह्यातल्या बारा मावळांपैकी एक आहे.

या नदीचा उगम तोरणा किल्ल्याच्या परिसरात, वेल्हे तालुक्यात होतो. कानंद नदी साखर या गावाजवळ गुंजवणी नदीला मिळते.

कानंदी नदीच्या पाणलोट क्षेत्रात खालील गावे येतात.:-

गेळगाणे, रायदंडवाडी , घिसर, भट्टी, वाघदर, निवी, धानेप, अंत्रोली,विहीर, कोंढवली, वेल्हे बुद्रुक, वेल्हे बु घेरा, पाबे, दापोडे, वांजळे, लाशीरगाव, खांबवडी, मालवली, खरीव, वैद्यवाडी,कोदापूर,बोरवाडी