Jump to content

कादंबरीकार

कादंबरी लेखन करणाऱ्या लेखकास कादंबरीकार असे संबोधले जाते. मराठी भाषेत अनेक थोर कादंबरीकार होऊन गेले. कादंबरीकार हे आपल्या लेखणीच्या बळावर वाचकाला काल्पनिक विश्वात घेऊन जातात, व कादंबरीतील व्यक्तींना जाणवणाऱ्या भावविश्वाची ओळख करून देतात.

इतिहास

इ.स.पूर्व सातव्या शतकात दशकुमारचरित हे लेखन दंडी या संस्कृत लेखकाने केले. दहा कुमारवयीनांचे जीवन दर्शवणारी ही जगातली पहिली कादंबरी आहे असे काही इतिहास तज्ज्ञ मानतात. तसेच सॅतिरिकॉन हे इ.स पूर्व ५० मध्ये लिहिलेली रोमन काव्य कादंबरीही आद्य कादंबरी मानली जाते. मात्र कथावस्तू असलेली, सातव्या शतकात बाणभट्ट लिखित कादंबरी नावाचा ग्रंथ हीच पहिली कादंबरी मानली जावी असे अनेकांचे मत आहे.

या 'कादंबरी' ग्रंथावरून मराठीत काल्पनिक अनेक प्रकरणे असलेल्या लेखनास कादंबरी हे नाव पडले. हिंदी भाषेत या लेखन प्रकारास उपन्यास म्हणतात, तर गुजराथीत नवलकथा.

जपानी लेखिका मुरासाकी शिकिबू याही एक आद्य कादंबरीकार मानल्या जातात. त्यांनी अकराव्या शतकात गेंजी मोनोगातरी नावाची पहिली कादंबरी लिखित स्वरूपात निर्माण केली.

लक्ष्मणशास्त्री मोरेश्वर हळबे हे मराठी भाषेतील आद्य कादंबरीकार मानले जातात. इ.स. १८६१ मध्ये त्यांनी लिहिलेली 'मुक्तामाला' ही कादंबरी मराठीतील पहिली कादंबरी होती.

बाबा पद्मनजी यांनाही त्यांच्या यमुनापर्यटन या लेखनामुळे काही इतिहासतज्ज्ञ आद्य कादंबरीकार मानतात.

नेमीचंद्र हा कानडी भाषेतील आद्य कादंबरीकार मानला जातो. त्याने लीलावती ही कादंबरी चंपूपद्धतीत लिहिलेली आहे.

मराठी भाषेतील प्रमुख कादंबरीकार