Jump to content

कातनेश्वर

  ?कातनेश्वर

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरपूर्णा
जिल्हापरभणी जिल्हा
भाषामराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
• आरटीओ कोड

• एमएच/

कातनेश्वर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील एक गाव आहे.

ऐतिहासिक पार्श्वभूमी

कातनेश्वर हे परभणी जिल्ह्यातील गाव आहे. पूर्वी हे गाव कांचनेश्वर क्षेत्र या नावाने प्रसिद्ध होते. या गावात कांचनेश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. एकेकाळी संपूर्णपणे पाषाणाचे असलेल्या या मंदिराचे नूतनीकरण झाल्यामुळे हे मंदिर आता सिमेंटचे झाले आहे.

राजस्थानातले सिसोदिया राजपूत दक्षिणेस आले काही सिसोदिया सातारा जिल्ह्यात स्थिरावले व कालांतराने ते साताऱ्याचे सिसोदे म्हणून ओळखले जाऊ लागले..हेच नंतर कांचनक्षेत्री आले व शिंदे झाले. तदनंतर शिंदे हे आडनाव बदलून ते चापके झाले.असा ईतिहास आहे. शिवकाळामध्ये ह्या शिंद्यानी चांगलाच पराक्रम गाजवला होता. त्यात धनुर्विद्या त्यांना चांगलीच ठावूक होती , गनिमांना ते त्याद्वारे पाराजित करत संस्कृतात धनुचा अर्थ "चाप "होतो म्हणुन या शिंदेचे चापके असे आडनाव झाले हे चापके पुर्णा नदीच्या परीसरात येऊन राहीले . खानापुरचे काळदाते, बलस्याचे शिंदे व कात्नेश्वरचे चापके एकाच शिंदे-सिसोदे वंशातले होत.

कातनेश्वर गावात दनकेश्वर मारुती,रेणुका देवी, मार्तन्ड इत्यादींची सुरेख बांधणीची मंदिरे आहेत. कांचनेश्वर महादेवाचे मंदिर इसवी सन पूर्व काळात झाले होते, असा अंदाज आहे. कांचनेश्वार महादेवाचे दिव्यलिङ्ग वालुकामय पाषाणाचे आहे. कांचनेश्वराचाच अपभ्रंश कातनेश्वर होय.

कात्नेश्वरचे चापके हे सुर्यवंशीय असुन कौडिण्य गोत्री 96 कुळी मराठा होत.

भौगोलिक स्थान

हवामान

येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३९ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.

लोकजीवन

प्रेक्षणीय स्थळे

नागरी सुविधा

जवळपासची गावे

संदर्भ

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate