काणी रोग
काणी रोग (en:Sugarcane smut) हा उसावरील रोग आहे. याला 'चाबूककाणी' असेही म्हणतात. याचे कारण म्हणजे या रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या उसातून काळ्या रंगाचा चाबकासारखा शेंडा बाहेर आलेला दिसतो. हा काळा रंग बुरशीमुळे आलेला असतो.
- उसावरील काणी रोग 'स्पोरोसोरीयम सायटामिनम' (en:Sporisorium scitamineum) या बुरशीमुळे (en:Fungus) होतो. स्पोरोसोरीयम सायटामिनम पुर्वी उस्टिलॅगो सायटामिन (en:Ustilago scitamines) या नावाने ओळखले जायचे.
- हा रोग महाराष्ट्र, भारतासह जगभरातील सर्व ऊसशेतांत आढळतो.
- हा रोग गहू, बाजरी, ज्वारी, ऊस, मका इत्यादी पिकांवरही येतो.[१]