Jump to content

काणकोणची कोकणी

Look up काणकोणची कोकणी in
Wiktionary, the free marathi dictionary.
काणकोणची कोकणी ह्या बोलीभाषेची शब्दसूची
विक्शनरी, या मुक्त शब्दकोशात पाहा/तपासा/अद्याप नसलेले शब्द/वाक्यांश जोडा अथवा सूची:मराठी बोलीभाषातील शब्द येथे मराठी बोलीभाषांची सामायिक शब्दसूची पहा

गोव्यातील काणकोण या गावाच्या आसपास बोलली जाणारी काणकोणची कोकणी ही एक मराठी भाषेची स्वतंत्र बोली आहे. तिथले श्रीमंत हिंदू शेतकरी ही बोली बोलतात. गोव्यातीलच शेतमजुरांची बोली, ख्रिश्चनांची बोली, गावड्यांची बोली किंवा कारवारी या बोलींपेक्षा काणकोणची कोकणी भिन्‍न आहे.

केवळ नाकात उच्चारल्याने काही शब्दांचे अर्थ बदलतात
उदा०

दाताक - एका दाताला; दातांक - अनेक दातांना
न्हयिक - नदीकडे; न्हयिंक - नदीमध्ये
निडलो - (तो) झोपला; निडलों - (मी) झोपलो
निडले - (आम्ही/तुम्ही/ते) झोपले; निडलें - (मी) झोपले

’ओ’च्या जागी ’ऑ’ उच्चारल्याने अर्थ बदलतात
उदा०

पोट - गर्भ; पॉट - पोट
फोड - फोड (मोठी पुटकुळी); फॉड - (नागाचा) फणा
कोळसो - कोळसा; कॉळसो - कळशी
तोड - तोडगा; तॉड - (लाकडाचा) ओंडका
बोट - जहाज; बॉट - (हाताचे किंवा पायाचे) बोट

काही सर्वनामे

हाव - मी
मका/म्हाका - मला
मागे - माझा, माझे, माझ्या
तूं - तू
तुक - तुला
तुगे - तुझा, तुझे, तुझ्या
तेका - त्याला

संदर्भ

Konkani of Kankon (महाराष्ट्र सरकारचे प्रकाशन; लेखक - ए.एम. घाटगे)