काजू कतली
काजू कतली | |
उगम | भारत |
---|---|
प्रदेश किंवा राज्य | भारतीय उपखंड |
संबंधित राष्ट्रीय खाद्यप्रकार | भारत, बांगलादेश, पाकिस्तान |
मुख्य घटक | काजू, साखर, तूप |
भिन्नता | केशरी पेढा, बर्फी, पिस्ता बर्फी |
काजू कतली, किंवा काजू बर्फी, एक बर्फी सारखे भारतीय मिष्टान्न आहे. बर्फी बहुधा, साखर, आटलेले दूध आणि इतर घटकांसह (कोरडे फळ आणि सौम्य मसाले) बनवतात. केसर काजू कटली हे एक काजू कतलीचे प्रतिरूप आहे ज्यामध्ये केशरचा समावेश असतो .
हा पदार्थ बऱ्यापैकी कालावधीसाठी (बहुधा रात्रभर) पाण्यात भिजवलेल्या काजूच्या ठेच्या बरोबर तयार केला जातो. यात उकळलेला साखर द्रावण घालतात. तूप, केशर आणि सुकामेवा देखील घालू शकता. [१] नंतर हा लगदा उथळ, सपाट-बाटलीच्या डिशमध्ये पसरून चपटा केला जातो आणि याचे चौकट आकाराचे तुकडे करतात. तुकडे चांदीच्या वरखाने सजवले जातात. काजू कतली सामान्यतः लगद्यासाठी वापरल्या जाणाऱ्या घटक आणि वापरलेल्या प्रत्येक प्रमाणानुसार पांढरी किंवा पिवळी असते. दिवाळीच्या वेळी आणि इतर सणांच्या वेळी पारंपारिकपणे कतली खाल्ली जाते. [२]
काजू कटली ही दीर्घकाळ टिकणारी मिष्टान्न नाही, हिवाळ्यात ती ७ दिवसांपर्यंत टिकू शकते, परंतु उन्हाळ्यात एखाद्याने ३-४ दिवसांत ते खावे. भारतात लोकप्रियतेमुळे, बीकानेर आणि स्वीटडब्बा सारख्या अनेक विक्रेत्यांनी या मिष्टान्नाची साखर मुक्त आवृत्ती बनविली आहे.
संदर्भ
- ^ Bladholm, Linda (12 August 2000). The Indian grocery store demystified. p. 175. ISBN 1580631436.
- ^ Kapoor, Sanjeev. Sweet Temptations. Popular Prakashan. ISBN 8179915700.