काचबिंदू
काचबिंदू काचबिंदू हा विकार नसून डोळ्यात निर्माण होणारे दोष व लक्षणे मिळून तशा प्रकारची स्थिती निर्माण करतात. याला काचबिंदू (ग्लागोमा) , कालामोनिया आदी नावांनी संबोधले जाते. काचबिंदू झालेल्या व्यक्तीमध्ये डोळ्याच्या बाहुलीत काचेसारखी लकाकी दिसते. म्हणून त्याला काचबिंदू असं म्हणतात. काचबिंदू सर्व प्रकारच्या वंशामध्ये होतो. मधुमेहासारख्या आजारात काचबिंदू होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून मधुमेह झाल्यानंतर डोळे तपासणे गरजेचे असते.[१]
लक्षणे
- धुरकट दृष्टी व प्रतिमेच्या कडेला अंधार दिसणे.
- समोर सरळ बघत असताना कडेचे काहीही न दिसणे.
- डोळा दुखणे.
- तीव्र डोकेदुखी व पोटदुखी.
- डोळ्यांची औषधे सतत बदलणे.
संदर्भ
- ^ आरोग्य मंत्र - काचबिंदू : गैरसमज आणि वस्तुस्थिती[मृत दुवा] विदागारातील आवृत्ती[permanent dead link]