Jump to content

काचघरे

काचघरे (GLASS HOUSES) अभिवृद्धीकरता तयार करण्यात आलेल्या काचघरांना आतून पॉलीथिनचे अस्तर वापरण्यात येते. अर्थात अभिवृद्धीकरता काचघरांचा वापर शीत हवा मानाच्या प्रदेशातच करतात. काचघरांतल्या आतल्या बाजूने पोंलीथिनचे अस्तर वापरल्यामुळे काचघरांतले उष्णतामान टिकून राहाण्यास मदत होते. शीत हवामानाच्या भागात या अशा काचघरांत फुले व भाजीपाल्याची देखील लागवड करतात. हॉलंड, जपान, डेन्मार्क, बेल्जियम या देशात या काचघरांचा सर्रास वापर होत आहे. पॉलीथिन हे छाट्याच्या रूजवणीला आवश्यक तेवढा सूर्यप्रकाश व अधिक इन्फ्रारेड आणि अल्ट्रा-वॉयलेट किरणे जाऊ देते. व त्याचा मुळया फुटण्यावर अनुकूल परिणाम होतो. कुंड्यामध्ये बिया व छाट्याच्या रूजवणीकरता तारान्च्या फ्रेमवरपोंलीथिनची पिशवी वापरून आतली आर्द्रता वाढवता येते. त्यामुळे बी व छाटे यांना मुळया फुटण्यास मदत होते.