Jump to content

काच

काचेचा शोभिवंत गोळा

काच हे एक स्फटिक नसलेले घनरूप आहे. सिलिका (सिलिकॉन डाय-ऑक्साइड) व सिलिकेटे यांचा रस तापवून वेगाने थंड झाल्यावर काच तयार होते. काच नैसर्गिकरित्याही तयार होते. ज्वालामुखीतून बाहेर पडलेला लाव्हा वेगाने थंड झाल्यावर नैसर्गिकरित्या काच तयार होते

प्रकार

१)अपारदर्शक - वितळलेला स्फटिक थंड करताना हवेचे बुडबुडे राहिले तर काच पारदर्शक होत नाही.

२)अर्धपारदर्शक - तुषारित काचा अर्धपारदर्शक असतात. या काचांमधून प्रकाशकिरणे आरपार जातात पण ती विखुरली जातात, त्यामुळे वस्तू धुसर दिसतात.

३)रंगीत काच - वाळू, लाइम, सोडा यातील अशुद्धतेमुळे स्वच्छ रंगहीन काच तयार होण्याऐवजी एखाद्या रंगाची छटा असलेली काच तयार होते.

४)सुरक्षित काच - तापवलेली अचानक थंड करून आकुंचन केल्याने काच कणखर होते. परंतु रासायनिक पद्धतीने तयार झालेली काच जास्त कणखर असते. रसायनत: स्थिर असल्याने उष्णतेचा परिणाम होत नसल्याने बोरोसिलिकेट काचेची भांडी मायक्रोवेव्ह अवन मध्ये वापरता येतात. या काचेत सिलिका, बोरिक ऑक्साइड, सोडा आणि अ‍ॅल्युमिना यांचे मिश्रण असते.काचेपासून भिंग तयार करतात त्याचे अन्तर्वक्र अणि बाह्यवक्र असे दोन प्रकार पडतात.

काचेचे उपयोग:-

१)बाटल्या, बरण्या, तावदानाच्या काचा इत्यादी रोजच्या वापरातील काचेच्या वस्तु.

२)वाहनाच्या पुढील व मागील काचा,खिडक्यांच्या काचा ई.

३)अंतरगोल,बहिर्गोल,सपाट आरसे तयार करण्यासाठी काच वापरली जाते.

४)चष्म्याच्या किंवा गॉगल्सच्या काचा तयार करण्यासाठी काच वापरतात.

५)प्रयोगशाळेतील साहित्य मजबूत काचेपासून बनवतात.

६)मोठ्या इमारातमध्ये शोभेच्या काचा इमारतीच्या बाजूने लावतात त्यामुळे इमारतीचे सौंदर्य वाढते .

७)मोबाईल फोनच्या स्क्रीन मधेही काच वापरतात.




बाह्य दुवे