काकड
काकड हे झाड मध्यम आकाराचे आहे. हे नदी व नाल्याकाठी विशेष दिसून येते.
उपयोग
अंग दुखत असल्यास लचक भरली असल्यास या झाडाची साल पाण्यात ठेचून,त्याचा रस पाजतात. भूक लागत नसल्यास,ताप आल्यास,या झाडाच्या सालीचा किंवा पानाचा काढा करून पाजतात. व डोके दुखत असल्यास, फोड झाल्यास काही व्रण (जखम) झाल्यास या झाडाची पाने वाटून लावतात.या झाडाला फळे लागतात. व या झाडाच्या कच्च्या फळाचे लोणचे घालतात. गजकर्ण झाल्यास बिया वाटून लावतात.'पान लागले' साप चावला तर वैद्य लोक या झाडाची औषधी देतात. या झाडाची पिकलेली फळे खातात.
संदर्भ
- गोईण - डॉ. राणी बंग