कांदे पोहे
कांदे पोहे | |||||||
प्रकार | नाश्ता | ||||||
---|---|---|---|---|---|---|---|
उगम | भारत | ||||||
प्रदेश किंवा राज्य | महाराष्ट्र | ||||||
द्वारे निर्मित | अज्ञात | ||||||
शोध लावला | अज्ञात | ||||||
अन्न बनवायला लागणारा वेळ | 10 मिनिटे ते 15 मिनिटे | ||||||
अन्न वाढण्याचे तापमान | गरम गरम | ||||||
मुख्य घटक | पोहे, शेंगदाणे, कांदे हिरवी मिरची, | ||||||
सामान्यतः वापरले जाणारे साहित्य | तेल, चटणी, मीठ, हळद | ||||||
भिन्नता | सामान्य | ||||||
अन्नाद्वारे प्राप्त ऊर्जा (प्रती 1 प्लेट द्वारे) | 180 किलो कॅलरी (754 किलो जुल)tarladalal | ||||||
पौष्टिक मूल्य (प्रती 1 प्लेट द्वारे) |
| ||||||
तत्सम पदार्थ | बटाटे पोहे | ||||||
कांदे पोहे, बटाटेपोहे हा मराठी खाद्यपदार्थ आहे.
साहित्य :
पूर्व तयारी : पोहे करण्या अगोदर पोहयांचे दोन प्रकार असतात हे जाणून घेणे आवश्यक आहे. १} जाड पोहे २} पातळ पोहे
पोहे निवडून व पाण्याने भिजवून रोळी मध्ये काढून घ्यावे म्हणजे पाणी निथळून जाईल. जाड पोहे भिजवण्यासाठी पाण्याचा हबका{प्रमाण}जास्त मारावा लागतो. आणि पातळ पोहे भिजवण्यासाठी पाण्याचा हबका{प्रमाण}कमी मारावा लागतो.
कढई मध्ये तेल टाकुन त्यात मोहरी/जिरे टाकावे. तडतडल्यानंतर त्यात चिरलेले कांद्याचे काप टाका व नंतर थोड्यावेळाने त्यात चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाका. मिरच्या थोड्या पांढुरक्या झाल्यावर नंतर हळद व भिजवलेले पोहे टाका. हळदीचा समान रंग येईपर्यंत परता.
सजावट : खायला देताना कोथिंबिर व खोबऱ्याचा कीस टाकुन द्यावे. आणि त्यावर मिरचीचे बारीक काप टाकुन घ्या.
इतर माहिती
- कांद्याचे प्रमाण थोडे कमी करून त्यात उकडलेले/कापा करून थोडे तळलेले बटाटे घातल्यास हे आलूपोहे होतात.
- पोहे तयार करताना तुमच्या आवडीनुसार त्यात शेंगदाणे, बटाटा किंवा हिरवा वाटणे ही घालू शकता. कांद्याबरोबर या गोष्टी परतून घ्या.