Jump to content

कांडला

कांडला (गुजराती: કંડલા, रोमन लिपी: Kandla) हे भारताच्या गुजरात राज्यातल्या कच्छ जिल्ह्यात वसलेले एक शहर व महत्त्वाचे बंदर आहे. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर करांची हे प्रमुख बंदर पाकिस्तानकडे गेल्यामुळे हे बंदर इ.स. १९५० साली स्थापन करण्यात आले.

कांडला बंदराला लागून गांधीधाम हे सुनियोजित शहर वसवण्यात आले.