कांचन प्रकाश संगीत
कांचन प्रकाश संगीत ह्या आकाशवाणीवरील विविध कार्यक्रमांच्या निर्मात्या होत्या.
हिंदी विषय घेऊन एम.ए. झालेल्या कांचन प्रकाश संगीत यांनी मास्टर ऑफ़ मास कम्युनिकेशन ॲन्ड जरनॅलिझम (MMCJ) हा अभ्यासक्रम पूर्ण केला व त्या १९७६ साली औरंगाबाद आकाशवाणीवर निवेदक म्हणून नोकरीला लागल्या. आकाशवाणी औरंगाबाद-मुंबईसह त्यांनी विविध भारतीमध्येही काम केले आहे. ३०-१-२०१४ रोजी त्या विविध भारतीच्या उपसंचालक म्हणून निवृत्त झाल्या.
कांचन प्रकाश संगीत ह्या एक लेखिकाही आहेत. त्यांचा 'वन वुमन शो’ हा हिंदी-मराठीत लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला आकाशवाणीवरचा कार्यक्रम अतिशय गाजला. याशिवाय कांचन प्रकाश यांनी लिहिलेले 'ती तशी तर मी अशी’, 'रंगतरंग’, 'आजीबाईचा खोपा’ या कार्यक्रमांचे रंगभूमीवर शेकडो प्रयोग झाले आहेत. 'बालगाणी ते लावणी’ हा त्यांचा कविता आणि गाणी यांच्यावर आधारलेला संगीत कार्यक्रम त्या रंगमंचावर सादर करतात.
कांचन प्रकाश संगीत यांची निर्मिती असलेले आकाशवाणीवरील लोकप्रिय हिंदी-मराठी कार्यक्रम
- उंबरठा (हिंदीत देहलीज)
- जीवनसुरभ
- संगीत सरिता (विविध भारतीवरील या नावाच्या ३०हून अधिक मालिकांचे ५०० एपिसोड्स झाले.)
- मानवी उत्क्रांती
- सखी सहेली (हा कार्यक्रम २ जून २००४पासून पुढे सतत पाच वर्षे चालला होता.)
पुस्तके
- अन्वयार्थ (ललितकथा)
- कोथिंबिरीचा वाफा (कथासंग्रह)
- गहुराणी (ललित)
- पाथेय (कवितासंग्रह)
- स्वार्थ की सलीब पर (हिंदी कवितासंग्रह)
- हरितायन (ललित)