कस (चित्रपट)
कस हा एक गाजलेला मराठीचित्रपट आहे.
- दिग्दर्शक : महेश सातोस्कर, अरुणा जोगळेकर
- कलाकार : प्रसाद ओक, भार्गवी चिरमुले, राजेश शृंगारपुरे, निलम शिर्के, माधव अभ्यंकर, विद्या पटवर्धन, आनंद अभ्यंकर
- संगीत : भावगंधर्व पं. ह्र्दयनाथ मंगेशकर
- गीतकार : आरती प्रभू
- गायक : स्वप्नील बांदोडकर, राधा मंगेशकर आणि आशा भोसले
- निर्मीती : दिपक कांबळे
कस ही अरुंधती मोडक (भार्गवी चिरमुले) नावाच्या एका सुशिक्षित आणि सुजाण स्त्रीची कथा आहे ! जगण्याचा संघर्ष कुणालाच सुटलेला नसतो. प्रत्येक जण संघर्ष करत असतो. फरक इतकाच की त्याची तीव्रता कमी / जास्त असते! या संघर्षात प्रत्येकाची सहनशक्ती आणि परिस्थीतीला सामोरे जाण्याची पद्धत वेगळी असते आणि तेथेच त्या व्यक्तीचा कस लागतो अशा कथासुत्रावर बेतलेल्या या चित्रपटची निर्मीती महेश सातोस्कर यांनी केली असून, या चित्रपटाचं दिग्दर्शन महेश सातोस्कर आणि अरुणा जोगळेकर यांनी केलं आहे. दिपक कांबळे प्रस्तुत या चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन पं ह्रदयनाथ मंगेशकरांनी केलं आहे!