कसारा लोकल
कसारा लोकल ही मध्य रेल्वेची सेवा मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कसारा अशी चालते. बहुतेक वेळा ही लोकल कल्याण आणि मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस दरम्यान येता जाता द्रुतगतीने धावते व मोजक्याच स्थानकांवर थांबते. कल्याण ते कसारा ती सर्व स्थानकांवर थांबते. या लोकलच्या वेळापत्रकला जोडलेले एस्टी महामंडळाच्या बसेसचे वेळापत्रक आहे. त्यामुळे नाशिक येथुनही कसारा लोकल मार्गे मुंबईला पोहोचणे शक्य आहे.
हे सुद्धा पहा
- भारतीय रेल्वे
- मुंबई उपनगरी रेल्वे - मध्य