कळमना रेल्वे स्थानक
कळमना दक्षिण पूर्व मध्य रेल्वे स्थानक | |
---|---|
स्थानक तपशील | |
पत्ता | कळमना, नागपूर |
गुणक | 21°10′04.7″N 79°08′26.1″E / 21.167972°N 79.140583°E |
समुद्रसपाटीपासूनची उंची | २९६ मी |
मार्ग | हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग |
फलाट | ६ |
इतर माहिती | |
विद्युतीकरण | होय |
संकेत | KAV |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | दक्षिण पूर्व मध्य रेल्वे |
स्थान | |
कळमना |
कळमना हे भारत देशाच्या नागपूर जिल्ह्यातील एक रेल्वे स्थानक आहे. मुंबई व कोलकाता शहरांना नागपूर मार्गे जोडणाऱ्या हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्गावर असलेले कळमना रेल्वे स्थानक नागपूर स्थानकाआधीचे एक महत्त्वाचे स्थानक मानले जाते.हे नागपूर स्थानकापासून सुमारे ६ किमी अंतरावर आहे. येथे ३ फलाट आहेत.या स्थानकावर सुमारे १८ गाड्या थांबतात.येथून कोणत्याही गाड्यांची सुरुवात होत नाही व कोणत्याही गाड्या येथे टर्मिनेट होत नाही.[१]
कळमन्याहून जाणाऱ्या महत्त्वाच्या गाड्या
- गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस
- गोंदिया-छत्रपती शिवाजी टर्मिनस विदर्भ एक्सप्रेस
- पुणे-हावडा आझाद हिंद एक्सप्रेस
- मुंबई-हावडा गीतांजली एक्सप्रेस
- लोकमान्य टिळक टर्मिनस-हावडा समरसता एक्सप्रेस
- नागपूर-बिलासपूर इंटरसिटी एक्सप्रेस
- छत्तीसगड एक्सप्रेस
- शिवनाथ एक्सप्रेस[१]
संदर्भ
- ^ a b Jayashree. "Kalamna Station - 18 Train Departures SECR/South East Central Zone - Railway Enquiry". indiarailinfo.com. 2018-12-29 रोजी पाहिले.