कळंबोली
कळंभोळी याच्याशी गल्लत करू नका.
कळंबोली | |
भारतामधील शहर | |
कळंबोली | |
देश | भारत |
राज्य | महाराष्ट्र |
जिल्हा | रायगड जिल्हा |
लोकसंख्या (२०००) | |
- शहर | ४०,००० |
प्रमाणवेळ | यूटीसी+०५:३० |
कळंबोली हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील एक गाव व सिडकोने बनवलेला नवी मुंबई शहराचा एक नोड आहे. पनवेल शहरापासून जवळ असलेल्या कळंबोली येथे मुंबई–पुणे द्रुतगतीमार्ग व राष्ट्रीय महामार्ग ४ येऊन जुळतात. कळंबोली रेल्वे स्थानक मध्य रेल्वेच्या दिवा-पनवेल मार्गावर असून कोकण रेल्वेमार्गे जाणाऱ्या काही संथ पॅसेंजर रेल्वेगाड्या येथे थांबतात.
२००० साली कळंबोलीची लोकसंख्या ४०,००० होती.
हवामान
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.