कल्पना दुधाळ
कल्पना दुधाळ मराठी कवयत्री आहेत. त्यांचे सिझर कर म्हणतेय माती आणि धग असतेच आसपास हे कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत.
त्यांना धग असतेच आसपास साठी महाराष्ट्र फाउंडेशनचा ललित ग्रंथ पुरस्कार मिळाला आहे.
त्यांनी शेती करतांना, घर सांभाळत दहा वर्षांत दोन कवितासंग्रह प्रकाशित केले आहेत. त्यांच्या कविता अनुभवाधिष्ठीत असतात. कवयित्री कल्पना दुधाळ यांच्या कवितेतून शेती आणि निसर्ग, शेतकरी स्त्री दुःख जाणीवा याचं उत्तम चित्रण या कवितांमधून दिसून येते.[१]