कलाल बांगडी
कलाल बांगडी या तोफेचा पल्ला १२किमी पर्यंत आहे असे म्हणतात आणि कितीही उन असले तरी तोफ अजिबात तापत नाही. एक आख्याईका अशी की, पेशव्यांनी किल्ला जिंकण्यासाठी ही तोफ आणवली होती पण किल्ला जिंकता न आल्याने निराश होऊन त्यांनी ती तशीच सोडून दिली. तिच पुढे सिद्दीने किल्ल्यात आणवली. तर काहींच्या मते ती इतकी जड होती ही ती बोटीने आणणे अशक्यप्राय होते. त्यामुळे ती तुकड्या तुक़ड्यात आणून इथेजोडण्यात आली कलाल बांगडी ही तोफ भारतातील पाच मुख्य तोफांपैकी एक आहे .[ संदर्भ हवा ]