Jump to content

कलांतान

कलांतान
Kelantan
मलेशियाचे राज्य
ध्वज

कलांतानचे मलेशिया देशाच्या नकाशातील स्थान
कलांतानचे मलेशिया देशामधील स्थान
देशमलेशिया ध्वज मलेशिया
राजधानीकोटा बारू
क्षेत्रफळ१४,९२२ चौ. किमी (५,७६१ चौ. मैल)
लोकसंख्या१६,३५,०००
घनता१०९.६ /चौ. किमी (२८४ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२MY-03
संकेतस्थळhttp://www.kelantan.gov.my/

कलांतान (देवनागरी लेखनभेद: केलांतान, क्लांतान; भासा मलेशिया: Kelantan; सन्मान्य नाव: दारुल नईम (वर लाभलेला प्रदेश) ;) हे मलेशियामधील एक राज्य असून द्वीपकल्पीय मलेशियाच्या ईशान्येस वसले आहे. कलांतानाच्या उत्तरेस थायलंडाच्या नरादिवात प्रांताशी भिडलेली आंतरराष्ट्रीय सीमा असून आग्नेयेस तरेंगानू, पश्चिमेस पराक, दक्षिणेस पाहांग ही मलेशियाची राज्ये आहेत. कलांतानाच्या ईशान्येस दक्षिण चीन समुद्र आहे.

कलांतान कृषिप्रधान राज्य असून तांदळाच्या मुबलक उत्पादनामुळे 'मलेशियाचे तांदळाचे कोठार' मानले जाते.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत