Jump to content

कर्म (बौद्ध धर्म)

1]'कम्म'[कर्म']

कर्म म्हणजे क्रिया अथवा कार्य. बौद्ध तत्त्वज्ञानात कर्म म्हणजे सहेतुक (चेतन मना) द्वारे केलेली कृती. ज्यामुळे भविष्यातील परिणाम होऊ शकतात.

धर्म या मराठी शब्दाला पाली भाषेत धम्म असे म्हणतात. मानवाच्या स्वैराचार वागण्याला धर्म किंवा धम्म लगाम लावण्याचे काम करीत असल्याने मानवाला धर्म किंवा धम्माची आवष्यकता भासते. धर्म अनेक आहेत परंतु धम्म मात्र एकच आहे. जो धम्म मानवजातीच्या हितासाठी आहे, मानवाच्या कल्याणासाठी आहे. असा बुद्धधम्म ‘‘या अन् पहा’’त्याला अनुभुतीच्या अश्या सम्यक ज्ञानाच्या कसोटीवर घासुन पहा. पटलाच तर घ्या! धम्मात देवांचे अवतार म्हणजेच दैववाद, आत्मा, पुनर्जन्म, अंधश्रद्धेला, पुजा कर्मकांडाला थारा नाही. धम्मात केवळ शुद्ध आचरणाला महत्त्व आहे. इतर धर्मात देवांची स्तुती करून किंवा देवाच्या आज्ञा पाळण्यासाठी असलेल्या मध्यस्थाच्या, पुजाऱ्यांच्या मार्फत तुमची शिफारस केली जाते अथवा त्यांच्या मार्फतच पुजा, होमहवन यज्ञ करून त्याला अधिकाधिक दान देऊन तुमच्या कुशल अकुशल कर्मांचा विचार न करता केवळ त्या दलालाला खुश करून तो तुम्हाला देवाचा माणुस म्हणुन मोक्ष प्राप्त करून देतो असे सांगुन फसवतो.अन तुम्ही फसता. येथे अश्या दलालांना, पुजाऱ्याला स्थान नसल्याने यज्ञ, होमहवन व मर्जी राखण्याचा प्रश्नच उदभवत नाही. केवळ वास्तवता अन् सत्य धम्मात असुन प्रज्ञा, शिल करुणेला अधिक महत्त्व देणारा, मानवाच्या विकासाची चक्रे गतीमान करणारा हा धम्म आहे. या धम्मात कुशल कर्माने व आचरणाने मोक्ष प्राप्तीचा मार्ग दाखवला जातो. त्यासाठी धम्माचे प्रमुख अंग असलेला हा कर्मसिद्धांत किंवा कम्मसिद्धांत अनिवार्य आहे. कर्मसिद्धांतचा/कम्मसिद्धांताचा अभ्यास अन् त्यानुसार कम्म, कर्म करणे हेच अभिप्रेत आहे.

बुद्ध धम्म हा निसर्गनियमाला अनुसरून वैज्ञानिक दृष्टिकोनातुन सम्यक ज्ञानाच्या कसोटीवर घासणारा असा अनुमानात्मक धम्म आहे. मानवी मनाचे सामर्थ्य ओळखुन मानवाला केंद्रबिंदु मानुन अज्ञानाच्या अंधकारातुन ज्ञानाच्या प्रकाशा कडे ‘‘अत्त दिप भव’’ म्हणजे स्वयंप्रकाशीत व्हा असा सांगणारा हा सद्धम्म आहे. तथागत भगवान गौतम बुद्धांनी नियतीच्या हातातले भवचक्र ज्ञानाच्या अविष्काराने स्वतःपरिवर्तन करून मानवाच्या हाती दिले. त्यासाठी त्यांनी धम्म परिवर्तन केले. आणि सदाचारणाचा मध्यम मार्ग देऊन असंख्य लोकांना तरून जाण्याचा मार्ग दाखविला. म्हणुनच ते मोक्षदाता न होता मार्गदाता झाले.

2]धम्माचे प्रमुख दोन उद्देश

धम्माचे प्रमुख दोन उद्देश आहेत ते म्हणजे

  • देवदाह सुत्तानुसारः- सत्प्रवृत्ती म्हणजेच माणसाला प्रार्थना, कर्मकांड, धार्मिक विधी, यज्ञयापन शिकवण्या ऐवजी माणसाच्या नैसर्गिक प्रवृत्तीला वळण लावुन त्याला सुसंस्कृत करणे. तर,
  • सुल्लेखसुत्तानुसारः- एखादे उचित तत्त्व समजल्यावर जरी कोणी साथी नसला तरी धैर्याने त्या मार्गापासुन विचलीत न होणे.

धम्म हा तेव्हाच सद्धम्म असतो जेव्हा तो माणसामाणसांतले भेद करणारे अडसर मोडुन सर्वांना ज्ञानाचा मार्ग मोकळा करून प्रज्ञा,शिल अन् करुणेचे जतन व संवर्धन करतो.

धम्म आणि कम्म

धर्म अन् कर्म, किंवा धम्म अन् कम्म  हे एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत. जसे धर्म या मराठी शब्दाला पाली भाषेत धम्म असे म्हणतात. त्याचप्रमाणे कर्म या मराठी शब्दाला पाली भाषेत्त कम्म असे म्हणतात. प्रत्येक धर्मात कर्म आहे, कर्माशिवाय धर्म होऊ शकत नाही. परंतु प्रत्येक धर्मांची कर्मे ही वेगवेगळी आहेत. तथागत गौतम बुद्ध यांनी सत्य, वास्तवता, विज्ञान, निसर्गनियमन आणि स्वयंम ज्ञानाच्या कसोटीस उतरलेल्या धर्माचे म्हणजेच धम्माचे समर्थन केले आहे. तसेच मानवी मनाचे सामर्थ्य ओळखुन मानवालाच केंद्र बिंदु केले आहे. त्यानुसार त्यांनी कम्मसिद्धांत मांडला म्हणजेच मराठी भाषेत त्यालाच कर्म सिद्धांत असे म्हणतात. नेमके याच मराठी बोली भाषेचा फायदा घेऊन या सनातनी धर्ममार्तडांनी तथागतांच्या मुळ पालि भाषेतले काही कम्म सिद्धांत जसेच्या तसे ठेवुन आपल्या नावावर खपवले. उदा. तूच तुझ्या जिवनाचा शिल्पकार, मुळ पाली भाषेत या मराठी वाक्याला ‘‘अत्तही अत्तनो नाथो’’ असे संबोधतात. त्याला आपल्या अंगच्या असलेल्या अज्ञानाचा किंवा धम्माचा अभ्यास नसल्याने अथवा पाली भाषेचे ज्ञान नसल्याने त्यांनी गैरवापर करून अंधश्रद्धेला खतपाणी घातले व त्यांचे काही सिद्धांत बोलीभाषेचा फायदा घेऊन या कर्मसिद्धांतामध्ये घुसडविले. त्यामुळे हा तथागतांचा मुळ शुद्ध स्वरूपातला कर्मसिद्धांत समजत नाही किंवा आपण तो जाणुन घेण्याचा प्रयत्न करीत नाही. त्यामुळेच त्यांनी बसविलेले आपल्या मानेवरचे हे जोखंड अजुन पर्यंत आपण उतरविले नाही. त्यामुळे आपण  अजुनही आपल्या घरात देवदेवतांचे फोटो ठेवुन त्यांची पुजाअर्चा करतो.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिधलेल्या बाविस प्रतिज्ञांचे पालन करीत नाही.त्याला कारणीभुत ते नव्हे आपणच आहोत परंतु सत्य हे सत्यच असते एकतरी दिवस ते आपला सत्याचा प्रकाश पाडणारच ! तेव्हा मुळ उद्येशापासुन फारकत घेऊन चालणार नाही.आपण भाग्यवान आहोत आपल्याला वास्तव्यात नसलेल्या कोणी देवदुताने,देवाच्या प्रेषिताने अथवा प्रत्यक्षःत कोणीही कधिही न पाहिलेल्या देवानेच हा धर्म दिलेला नसुन तुमच्या आमच्या सारख्याच दोन हाथ,दोन पाय अन् एक डोके असलेल्या,आपला जन्म ज्या नैसर्गिक पद्धतिने होतो अगदी त्याच पद्धतीने  राजा शुद्धोधन अन् माता महामाया यांच्या पोटी जन्म घेतलेल्या मानवानेच अविरत कष्ट सोसुन ज्ञानाच्या अविष्काराने सम्यक सम्बुद्ध होऊन हा धम्म दिला आहे. कर्म किंवा कम्म हा प्रत्येक धर्माचा आणि आपल्याही धम्माचे प्रमुख अंग आहे. धर्म अन् कर्म किंवा धम्म अन् कम्म हे एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत.कम्माशिवाय धर्म किंवा धम्माला महत्त्वच राहत नाही.म्हणुनच प्रत्येक बौद्ध बांधवांनी कम्मसिद्धांत समजावुन त्यानुसार आचरण करणे अगत्याचे आहे. किंबहुना आपल्या दैनंदिन जिवनमानातल्या आपल्या कार्यातुन चढउतारानेच आपण आपली प्रगती आपल्या हाताने,आपल्या कार्याने करू त्यासाठी हा कम्मसिद्धांत (कर्मसिद्धांत) समजणे महत्त्वाचे आहे.

3]कम्मविपाक

                              तथागत भगवान गौतम बुद्धांनी मांडलेला कर्मसिद्धांत (कम्म सिद्धांत) यालाच कम्मविपाक असे म्हणतात  कर्म म्हणजेच कार्य,क्रिया त्याला पाली भाषेत कम्म म्हणतात तर,विपाक या पाली भाषेतील शब्दाला मराठीत परिणाम असे म्हणतात.कम्मविपाक म्हणजेच कर्माचा परिणाम किंवा कोणते कर्म कोणते फळ देते.हे यातुन समजते.कम्म किंवा कर्म हे नैतिक व्यवस्थेवर अवलंबुन आहेत.नैतिकव्यवस्था म्हणजेच नितीव्यवस्था होय.निती म्हणजेच नितीमत्ता ही दोन प्रकारची आहे. एक म्हणजेच चांगली अन् दुसरी म्हणजेच वाईट त्या प्रकारे चांगली अन् वाईट नैतिकव्यवस्था निर्माण होते.नैतिकव्यवस्थाही मानवांनी केलेल्या कर्मावर,कम्मावर,कार्यावर अवलंबुन आहे.कम्म किंवा कर्म हे नैतिकव्यवस्था राखतात. तर,कम्म,कर्म,कार्य मानसांकडुनच केली जातात. म्हणजेच प्रत्यक्षअप्रत्यक्षरित्या मानवच नैतिकव्यवस्था सांभाळण्याचे काम करतो.ज्या प्रमाणे आकाशातील ग्रहगोलांच्या चलनवलनात,गतीत एक प्रकारची सुव्यवस्था आहे. तसेच ऋतुचक्रामध्येही सुव्यवस्था आहे. म्हणुनच हिवाळा,हिवाळा,पावसाळा असे तिन ऋतु निर्माण होतात.काहि विषिश्ठ सुव्यवस्थेनुसारच बीजांचे वृक्ष निर्माण होतात.वृक्षांपासुन फळ,अन फळांपासुन पुन्हा बीज.या एकामागुन एक सुव्यवस्थीत निर्मिती दर्षविणाऱ्या नियमांना बौद्ध परिभाषेत ऋतुनियमन, बीजनियमन असे संबोधले जाते.समाजामध्येही याच प्रकारचा असा नैतिक क्रम आहे.

कम्मनियमन या पाली भाषेत आलेल्या शब्दालाच कर्मनियम असे म्हणले जाते.ः- समाजामध्ये नैतिक व्यवस्था कम्मनियमना (कर्मनियमा) प्रमाणे सांभाळली जाते.कम्माचे(कर्माचे) प्रामुख्याःने दोन भाग आहेत.

3.1]कुशल कम्म, कुशलअथवा चांगले कर्म

'1)' कुशल कम्म, कुशलअथवा चांगले कर्म:- जे कार्य केल्याने आपणास दुःख किंवा पष्चाताप होत नाही तर समाधान लाभते,रात्री छान झोप लागते.त्या कम्माला,कर्माला कुशल कम्म असे म्हणतात हीच या कम्माला ओळखण्याची कसोटी आहे.तर,कम्म,कर्म हे विज्ञाननिष्ठ व निसर्गनियमांना अनुसरून असले म्हणजे कुशलच ठरते.उदा. पावसाळयात शेतकरी शेतीची कामे करतात.

3.2)अकुशल कम्म अथवा वाईट कर्म

'2) अकुशल कम्म अथवा वाईट कर्म:- जे कार्य केल्याने आपणास आज समाधान किंवा दुःख लाभते परंतु सदैव कुशल कम्म होई पर्यंत दुःख किंवा पष्चाताप होतो.रात्री झोप लागत नाही,अस्वस्थता वाटते ते कम्म किंवा कर्म म्हणजेच अकुशल कम्म होय.कम्म किंवा कर्म हे विज्ञाननिष्ठ व निसर्गनियमाला अनुसरून नसले म्हणजे ते देखील अकुशल कम्म,कर्म ठरते हीच त्या कम्माला ओळखण्याची कसोटी आहे.उदा.सतत मनावर ओझे असल्यासारखे वाटते.कोणीतरी आपले बिंग फोडेल आपले सहस्य उलगडु नये म्हणुन सतत भितीच्या असमाधानी छायेत वावरणात असणाऱ्यांचे कम्म किंवा कर्म म्हणजेच अकुशल कर्म,कम्म,दहशषतवादी कारवाया करणे किंवा हिवाळयात शरिराचे तापमान न राखणे इ.जर नैतिक व्यवस्था चांगली तर मनुष्य कुशल कम्म किंवा कर्म करतो.आणि नैतिक व्यवस्था वाईट असेल तर मनुष्य  अकुशल कम्म किंवा कर्म करतो.या कम्मनियमनावरून अथवा या कर्मनियमावरून सृष्टीची नैतिक व्यवस्था चांगली असेल अथवा वाईट असेल ती मानवांच्या कुशल अकुशल कम्मावरच (कर्मावरच) अवलंबुन असल्याने भ.बुद्धांच्या मते ही नैतिक व्यवस्था माणसांवरच सोपविलेली आहे.मानवांकडुन तिन (शाररिक) कायिक,चार वाचिक अन् तिन मानसिक अशी तिन प्रकारची कम्म किंवा कर्मे अहोरात्र सदैव नित्यनेमाने रोजच होत असतात. म्हणुनच ‘‘जो राखुन बोलतो,जो विचारांचा संयम करतो,जो आपल्या देहाने दुस-यास उपद्रव करीत नाही असा मनुष्य निब्बाण मिळवु शकतो.’’ही भंते पटीसेन यांना तथागतांनी शिकविलेली गाथा वैशिष्ट्यपूर्ण ठरते.

4] कम्म किंवा कर्म नियम

बुद्धप्रणित कम्म सिद्धांत हा विज्ञाननिष्ठ व निसर्गनियमांना अनुसरून असल्याने या दोहोंचाही कम्माशी,कर्माशी परस्पर सबंध आहे तर कम्माचा (कमार्चा) कर्ता हा मानव आहे.उदा. झाडे तोडल्याने वने उजाड झालीत्यामुळे पर्जन्यवृष्टी कमी झाली.वरील उदाहरणावरून झाडे तोडल्याचा सबंध मानवाशी निगडीत आहे. हे अकुशल कर्म,कम्म केल्याने नैतिक व्यवस्था वने उजाड झाल्याचे दर्शवितात.तर निसर्गनियमनानुसार पावसाळयात पडणारी पर्जन्यवृष्टी कमी झाली हे त्या अकुशषल कर्माचाच परिणाम होय.हे जर विज्ञानातुन सांगावयाचे झाल्यास ढगांना अडवणे अन् ढगांना गार वारा लागल्यास पर्जन्यवृष्टी होते हे स्पष्ट  असल्याने तथागतांची कम्मनियमना सबंधीची अथ्वा कर्मनियमाची चिकित्सक दृष्टी स्पष्ट होती.त्यात त्यांनी कोठेही ईष्वरावर हा भार सोपविलेला नसुन आपल्यासारख्या सर्व सामान्य माणसांवरच हा भार सोपविलेला आहे.यामध्ये कोठेही मध्यस्थाचा सबंध नाही.किंवा अंधश्रद्धाही नाही.म्हणजेच देव पाण्यात ठेवणे,होमहवन,यज्ञ करणे त्यामुळे पाऊस पडेल.हे सर्व मानवांनी केलेल्या कुशल अकुशल कम्मांचा, कर्मांचा परिणाम आहे. म्हणजेच जे पेराल ते उगवेल.

5]कम्माचे परिणाम

अ) बुद्धप्रणित (कम्म)कर्म नियमना प्रमाणे दिवसामागुन रात्र येते त्याचप्रमाणे (कम्मा) कर्मा मागुन त्याचा परिणाम येतोच.कुशल (कम्म) कर्म करणा-यास कुशल तर अकुशल (कम्म)करणा-यास त्याचा दुष्परिणाम टाळता येत नाही.

ब) कर्माचापरिणाम (कम्माचाविपाक) फक्त कर्त्यालाच भोगावा लागतो असे नसुन कधिकधि एकाच्या (कम्माचा) कर्माचा त्याच्या ऐवजी दुस-यालाच परिणाम (विपाक) भोगावा लागतो. उदा. चोर सोडुन दुस-यालाच पकडणे इ. हे सर्व  कम्मनियमनाचेच विपाक, परिणाम आहेत. कारण तोच (कम्मनियमन) कर्मनियम नैतिक व्यवस्था सांभाळतो किंवा मोडतो.

5.क] अहोसिकम्म 

क) कम्म,कर्म हे कधीकधी अहोसीकम्म होऊ शकते म्हणजे त्याचा काहीच परिणाम होत नाही. या अहोसी कम्मा,कर्मामध्ये ज्या कम्मांचा,कर्मांचा त्याच्या अंगच्या दुर्बलतेमुळे विपाक किंवा परिणाम होत नाही.अथवा जि (कम्म)कर्मे अन्य सबळ कारणांमुळे (कम्मांमुळे) बाद होतात त्यालाच अहोसी कम्म असे म्हणतात. उदा.सुरक्षारक्षकाची निवड,सैन्यदलातील भरती प्रक्रिया म्हणजेच दोन्ही प्रकारात उमेदवारांना निवड होण्यासाठी कश्ट करावे लागतात परंतु त्यातुन काही जणांचीच निवड होते. अन् इतर निवड न झालेले उमेदवार हे अहोसी ठरतात. ते केवळ त्यांच्या कर्माच्या अंगच्या दुर्बलतेमुळे अथवा निवड झालेल्या उमेदवारांच्या सबळ कर्मामुळे हे बाद ठरतात. या दृष्टीने (कम्म)कर्म अन् त्याचा परिणाम या दोहोंमध्ये काही कालांतर असते त्या दृष्टीने कर्माचे (कम्माचे) तिन विभाग आहेत.

5.1) दिट्ठधम्मवेदनिय कम्म:-

1) दिट्ठधम्मवेदनिय कम्म:- म्हणजेच तत्काळ फळ देणारे कर्म. हे असे कर्म आहे ज्याचा परिणाम तात्काळ मिळतो. उदा.एखादयाच्या मुखात विनाकारण मारले तर,तोही तत्काळ प्रत्युत्तर देतो.अपशब्द बोलणे,अरे म्हणले तर तो कारे असेच म्हणेल या कम्माला दिट्ठधम्मपेदनिय कम्म असे पाली भाषेत म्हणतात.

5.2) उपपज्जवेदनिय कम्म

2) उपपज्जवेदनिय कम्म:- म्हणजेच फार कालांतराने फळ देणारे कर्म:- ज्या कर्माचा परिणाम फार कालांतराने होतो त्या कर्माला उपपज्जवेदनिय कम्म असे पाली भाषेत म्हणतात. उदा.लावणी आंब्याची कोय शेतात लावणे,आपल्या लग्नानंतर आपल्या नातवंडांचे सुख पहाणे इ.

5.3)अपरापरीय वेदनिय कम्म:

3)अपरापरीय वेदनिय कम्म:- अनिष्चीत काळाने फळ देणारे कर्म:- ज्या कर्माचा परिणाम अनिष्चीत काळाने होतो त्या कर्माला पाली भाषेत अपरापरीय वेदनिय कम्म असे म्हणतात.उदा.जमिनीच्या वादा सबंधी दिवाणी दाव्याची केस कोर्टातुन चालणे,इ.

नैतिक व्यवस्था आणि कम्म

  • नैतिक व्यवस्था वाईट किंवा अकुषल असेल. तसेच वैज्ञानिक दृश्टीकोनातुनही नसलेले अन् निसर्गनियमालाही न अनुसरता  कर्त्याने केलेले (तिन प्रकारचे कायिक,वाचिक अन् मानसिक कर्म) कर्म हे वाईट किंवा अकुशल असेल. तर,(कम्म) कर्मनियमा प्रमाणे व कर्माच्या तिन विभागाप्रमाणे कर्त्याला किंवा कधीकधी  कर्त्याच्या ऐवजी दुस-यास दुष्परिणामच मिळतील.
  • नैतिक व्यवस्था वाईट किंवा अकुशल असेल अन् मानवाने केलेले (तिन प्रकारचे कायिक,वाचिक अन् मानसिक कर्म)कर्म हे वैज्ञानिक दृष्टिकोनातुन निसर्गाला अनुसरून कुशल असतील तर,(कम्म) कर्मनियमा प्रमाणे व कर्माच्या तिन विभागाप्रमाणे कर्त्याला किंवा कधीकधी  कर्त्याच्या ऐवजी दुस-यास थोडेफार दुष्परिणाम मिळतील.मात्र नैतिकव्यवस्था चांगली अथवा कुशल झाल्यास कर्त्याला किंवा कर्त्याच्या ऐवजी दुस-यास चांगले कुशल परिणामच मिळतील.
  • नैतिक व्यवस्था चांगली किंवा कुषल असेल अन् मानवाने केलेले (तिन प्रकारचे कायिक,वाचिक अन् मानसिक कर्म) कर्म हे वैज्ञानिक दृष्टिकोनातुन निसर्गाला अनुसरून कुशल असतील तर,(कम्म) कर्मनियमा प्रमाणे व कर्माच्या तिन विभागाप्रमाणे कर्त्याला किंवा कधीकधी  कर्त्याच्या ऐवजी दुस-यास निष्चितच चांगले कुशल परिणामाचे फळ मिळेल.
  • नैतिक व्यवस्था चांगली किंवा कुशल असेल अन् मानवाने केलेले ( तिन प्रकारचे कायिक,वाचिक अन् मानसिक कर्म) कर्म हे वैज्ञानिक दृष्टिकोनातुन निसर्गाला अनुसरून अकुशल असतील तर,(कम्म) कर्मनियमा प्रमाणे व कर्माच्या तिन विभागाप्रमाणे कर्त्याला किंवा कधीकधी  कर्त्याच्या ऐवजी दुस-यास थोडेफार चांगले परिणामाचे फळ मिळेल मात्र नैतिकव्यवस्था वाईट किंवा अकुशल झाल्यास कर्त्याला किंवा कर्त्याच्या ऐवजी दुस-यास दुष्परिणामच भोगावे लागतील.अश्या प्रकारे वरील तिन कर्मविभागांना दोन प्रकारच्या नैतिक व्यवस्थेशी तसेच वैज्ञानिक अन् निसर्गनियमनाला अनुसरून अथवा न अनुसरता कर्त्याने केलेल्या ( तिन प्रकारच्या कायिक,वाचिक अन् मानसिक कुशल,अकुशल कर्मांशी) कुशल,अकुशल कर्मांशी ताडुन पहावे. तेव्हा कुशल कर्मापासुन होणारा लाभ प्रत्येक कुशल कर्म करणा-यालाच मिळतो. आणि अकुशल कर्माचा दुश्परिणाम कोणला टाळता येत नाही. म्हणुनच भ.गौतम बुद्ध आपल्या उपदेषात सांगतात असे कुशल कर्म करा म्हणजे मानवतेला चांगल्या नैतिकव्यवस्थेचा लाभ होईल.कारण कुशल कर्मानेच नैतिकव्यवस्था कुशल राखली जाते.अकुशल कर्म करू नका. कारण त्यामुळे नैतिकव्यवस्थेची हानी होते.आणि मानवता दुःखी होते. हया सर्व बाबी विचारात घेतल्यास भ.बुद्धांच्या (कम्माचा) कर्माचा नियम अनिवार्य असल्याने त्याला कोठेच बाधा येत नाही व्यक्ती येतात अन् जातात पण विष्वाची नैतिकव्यवस्था कायम राहते त्या प्रमाणेच ही व्यवस्था बनविणारा (कम्मनियमनही) कर्मनियम अप्रतिहत राहतो.इतर धर्मात कर्माचे फळ हा ईष्वर देतो असे समजतात परंतु बुद्ध धम्मात ईष्वरा ऐवजी ते स्थान नितीला प्राप्त झाले आहे. म्हणजेच कर्माचे फळ हे निती देते. आणि ही निती केवळ मानवांचीच असते.त्याचा सदभाग्याशी किंवा दुर्भाग्याशी काहीच सबंध नाही.तेव्हा आजपासुन नव्हे तर आत्तापासुनच आपण कुशल कर्म करायला सुरुवात करू जेणेकरून बौद्धबांधवांनी, मानवांनी केलेल्या कुशल कर्मावरून नैतिकव्यवस्थाही कुशल होईल अन् सारी मानवजात सुखी,क्षेमी,आनंदी होवून त्याचा फायदा अखिल मानवजातीलाच होईल.असा सम्यक संकल्प करू

व्युत्पत्ती

बौद्ध धर्मातील कर्म

संदर्भ