कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड पुरस्कार
कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड पुरस्कार हा पुरस्कार १५ ऑक्टोबर २००२ पासून देण्यात येतो. दादासाहेब गायकवाड यांनी रूढी परंपरे विरुद्ध व अस्पृश्यते विरुद्ध सामाजिक चळवळ उभारली. भूमीहीन शेत मजूर व कामगारासाठी देशात अनेक ठिकाणी त्यांनी सत्याग्रह केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांचा सिंहाचा वाटा होता तसेच त्यांनी पुरोगामी महाराष्ट्र घडविण्यामध्ये अत्यंत मोलाची कामगिरी केली हे कार्य विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाद्वारे दरवर्षी कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड यांच्या नावाने पुरस्कार प्रदान केला जातो.
लाभाचे स्वरूप
एक व्यक्ती व एक संस्था यांना अनक्रमे २१,००१ रुपये व ३०,००१ रुपये व शाल व श्रीफळ दिले जाते.
प्राप्तकर्ते
- २०१२ — सतकरनगर (जिल्हा जालना) भागातील नागोजीराव सतकर शिक्षण संस्थेस मिळाला.
हे सुद्धा पहा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार
- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार
- संत रविदास पुरस्कार
- शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार
- व्यसनमुक्ती पुरस्कार
- महाराष्ट्र भूषण पुरस्कार