कराड
कराड | |
जिल्हा | सातारा जिल्हा |
राज्य | महाराष्ट्र |
लोकसंख्या | ५६,१४९. २००१ |
दूरध्वनी संकेतांक | ०२१६४ |
टपाल संकेतांक | ४१५ ११० |
वाहन संकेतांक | MH-50 |
निर्वाचित प्रमुख | उमा हिंगमिरे . (नगराध्यक्ष) |
प्रशासकीय प्रमुख | के.एन.कुंभार. (नगरपालिका आयुक्त) |
संकेतस्थळ | [१] |
कऱ्हाड हे सातारा जिल्ह्यातील एक तालुक्याचे गाव आहे. यालाच कराड असेही म्हणतात. कृष्णा आणि कोयना या नद्यांच्या संगमावर हे गाव वसले आहे. त्या संगमाला ’प्रीतिसंगम’ असे म्हणतात. या नद्यांचा महाबळेश्वर येथे उगम झाला आहे. महाबळेश्वर कराड पासून १०० कि.मी. अंतरावर स्थित आहे. या नद्या महाबलेश्वर येथे वेगळ्या होतात व पुन्हा कराड येथे एकत्रित होत.कराड मध्ये यशवंतराव चव्हाण यांचे मोलाचे योगदान लाभले आहे.यशवंतराव चव्हाण हे पहिले मुख्यमंत्री कराड गावाचे सुपुत्र आहेत.कराड विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी " कराड समग्र दर्शन" हा विद्याधर गोखले व देशपांडे यांनी लिहिलेले पुस्तक वाचावे. हे पुस्तक म्हणजे कराडचा इतिहास आहे. विद्याधर गोखले हे पु.पां. गोखले म्हणजेच बाबुराव गोखले यांचे चिरंजीव आहेत.
इतिहास
कराडचे मूळ नाव करहाट्केश्वर होते. येथे स्थित असलेल्या पुरातन हट्केश्वर मंदिरावरून हे नाव प्रसिद्ध झाले. नंतर त्याचे रूपांतर करहाटक असे झाले. कालांतराने भाषिक बदलांमुळे हे शहर कराड नावाने प्रसिद्ध झाले. बारा बलुतेदार अठरा पगड जाती जमातीला एकत्र गुण्यागोविंदाने नांदवणारे कराड म्हणजे पुरोगामी महाराष्ट्राचे वैभव आहे.
कसे जाल?
पुण्याहुन कराडला जाण्यासाठी, सातारा मार्गे जावे लागते. कराड रेल्वे स्थानक पुणे-मिरज रेल्वेमार्गावर असून येथे रोज अनेक रेल्वेगाड्या थांबतात. कराड -सांगली अंतर-४५ कि.मी. कराड -सातारा अंतर-५२ कि.मी. कराड- कोल्हापूर अंतर- ७५ कि.मी.
भौगोलिक महत्त्व
कराड मध्ये कृष्णा व कोयना या नद्यांचा संगम आहे.तसेच कराड पासून ८ किमी वरती शेरे हे गाव या गावात कृष्णवंशीय यादव राहतात.
ऐतिहासिक महत्त्व
- जखीणवाडी लेणी
नकट्या रावळ्याची विहीर आगाशिव डोंगर(महादेवाचे मंदिर) सदाशीवगड (महादेवाचे मंदिर)
शैक्षणिक संस्था
पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेमार्फत १९५४ साली कराड येथे सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय स्थापन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च् शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी म्हणून हे महाविद्यालय सुरू करण्यात आले. २०१७ साली या महाविद्यालयाला NAAC Bangalore यांचेकडून A+ हा दर्जा देण्यात आला आहे. १००००हून अधिक विद्यार्थी या महाविद्यालात सध्या शिक्षण घेत आहेत.
कला, वाणिज्य , विज्ञान यामधील पदवी व पदव्युत्तर शिक्षणाची तसेच इतर अनेक कोर्सेसची महाविद्यालयात सोय उपलब्ध आहे.
राजकीय वारसा
- कराड ही यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. यशवंतराव चव्हाण हे संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते.
- २०१३ साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणारे पृथ्वीराज चव्हाण हे कराडचे आहेत.
- महाराष्ट्राचे कार्ल मार्क्स म्हणून ओळखले जाणारे थोर विचारवंत यशवंतराव मोहिते हे कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक या गावाचे आहेत. यशवंतराव मोहिते हे सुमारे २५-३० वर्षे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात होते.
- कराड दक्षिणचे आमदार माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांनी अनेक खात्यांची मंत्रीपदे भूषवली आहेत.
- पृथ्वीराज चव्हाण यांचे वडील आनंदराव चव्हाण हे केंद्रीय मंत्री मंडळात होते.
- पृथ्वीराज चव्हाण यांच्या आई प्रेमिला काकी यांनी महत्त्वाची राजकीय पदे भूषवली आहेत.
- कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील हे आहेत. त्यांचे वडील पी.डी. पाटील यांनी सर्वाधिक काळ कराडचे नगराध्यक्षपद भूषवले आहे
वैशिष्ट्य
कराड राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक, ऐतिहासिक तसेच औद्योगिकदृष्ट्या संपन्न व प्रगत आहे. तसेच येथील लोकांना कृष्णाकाठचे लोक म्हणूनही संबोधले वा ओळखले जाते. कराडला लाभलेल्या सुंदर वारस्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात कराड नावाजलेले व प्रगत आहे. कृष्णाकाठची माणस प्रेमळ व सुस्वभावी आहेत. तसेच येथील कर्तबगार थोर व्यक्तिमत्त्वांमुळे कराड कोणत्याही क्षेत्रात मागे नसल्याचे दिसून येते. कराडला यशवंत विचारांचा वारसा लाभला आहे.
खाद्यपदार्थ
कराडची “अख्खा मसुरा "थाळी बहुप्रसिद्ध आहे. अख्खा मसुरा ही कराडची खास ओळख आहे.
संदर्भ
बाह्य दुवे
- कराडची माहिती Archived 2010-11-23 at the Wayback Machine.
- कराड नगरपरिषद संकेतस्थळ Archived 2009-11-14 at the Wayback Machine.
- महाराष्ट्राचे कार्ल मार्क्स - यशवंतराव मोहिते, लेखक- प्रकाश पोळ Archived 2020-01-10 at the Wayback Machine.
- आगाशीवची बौद्ध लेणी Archived 2013-05-28 at the Wayback Machine.