Jump to content

करवीर विधानसभा मतदारसंघ

करवीर विधानसभा मतदारसंघ - २७५ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, करवीर मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्यातील १. गगनबावडा तालुका, २. पन्हाळा तालुक्यातील बाजार भोगांव आणि काळे ही महसूल मंडळे आणि ३. करवीर तालुक्यातील कुडीत्रे, निगावे दुमाला, हळदी, बीड आणि सांगरुळ ह्या महसूल मंडळांचा समावेश होतो. करवीर हा विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[][]

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पी. एन. पाटील (सडोलीकर) हे करवीर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

आमदार

वर्ष आमदार[]पक्ष
२०१९पी. एन. पाटील (सडोलीकर) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१४चंद्रदीप शशिकांत नरके शिवसेना
२००९चंद्रदीप शशिकांत नरके शिवसेना

निवडणूक निकाल

संदर्भ

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे