करवीर नगर वाचन मंदिर
स्थापना
१५ जून १८५० रोजी कोल्हापूर नेटिव्ह लायब्ररी या नावाने याची स्थापना झाली.
वैशिष्ठ्ये
मराठी आणि अन्य भाषांतील वेगवेगळ्या विषयांवरील सुमारे एक लाख ग्रंथ जोपासत ही संस्था एकशे साठ वर्षे कार्यरत आहे. अनेक दुर्मिळ ग्रंथ आणि नियतकालिकांमुळे संशोधनाच्या संदर्भ सामुग्रीचे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे केंद्र असा या संस्थेचा लौकिक आहे. ग्रंथ शोधासाठी येथे टच स्क्रीनची सुविधा आहे.