Jump to content

कमळाचे बी

सुकत आलेली बीजथली
हिरवी बीजथली
सुकलेले बीज

कमळाचे बीज किंवा कमळगठ्ठा हे नेलुम्बो वंशातील वनस्पतींचे, विशेषतः भारतीय कमळाचे बी आहे. हे बी कमळ लागवडी व्यतिरिक्त, धार्मिक कार्य, आशियाई पाककृती आणि पारंपारिक औषधांमध्ये वापरले जातात. या बिया मुख्यतः टरफला सह, वाळलेल्या स्वरूपात विकल्या जातात. या बियांमध्ये औषधी गुणधर्मा सह प्रथिने, ब जीवनसत्त्वे आणि आहारातील खनिजे मोठ्या प्रमाणात असतात.

प्रकार

कमळाच्या बीजथळी मधील ताज्या बिया
वाळलेल्या कमळाच्या बियांपासून बनवलेले स्नॅक (थायलंड)

वाळलेल्या कमळाच्या बियांचे दोन प्रकार विक्रीसाठी उपलब्ध असतात; तपकिरी सालीसह आणि पांढरे साल विरहित बी . जेव्हा कमळाची बीजथळी जवळजवळ पक्व किंवा पूर्ण पक्व असते तेव्हा तीची कापणी केली जाते. किंवा जेव्हा बीजथळी हिरवी असून त्यातील बिया पूर्ण विकसित असतात. पांढऱ्या कमळाच्या बिया कवच आणि साल विरहित असतात. कापणी केल्यावर, बहुतेक कडसर चव असणारे बियांचे कोंब अलगद काढून टाकले जातात. तपकिरी बिया या बियाची साल पक्की चितकलेली असल्याने तपकिरी रंगाच्या दिसतात. तसेच या थोड्या जास्तच कठीण असतात. या कठीण बियांचे कोंब अर्धे बियाणे फोडून काढले जातात.

वाळलेल्या कमळाच्या बिया त्यांच्या अविभाज्यपणे पिवळ्या तपकिरी रंगात ऑक्सिडाइज होतात. तथापि, वाळलेल्या कमळाच्या बियांचे काही विक्रेते त्यांची उत्पादने हायड्रोजन पेरॉक्साइड, सोडियम हायड्रॉक्साइड किंवा इतर रसायनांनी ब्लिचिंग करून निर्माण करतात.

पोषणमूल्य

१०० ग्रॅम वाळलेल्या कमळाच्या बिया ३३२कॅलरीज ऊर्जा पुरवतात आणि त्यात ६४% कर्बोदके, २%चरबी, १५% प्रथिने आणि १४% पाणी असते. या बियांमध्ये ब जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात असतात, विशेषतः दैनंदिन मूल्याच्या (DV) ४३% पेक्षा जास्त थायामिन आणि विविध खनिजे, जसे की मॅंगनीज (११६% DV) आणि फॉस्फरस (६३% DV).[]

उपयोग

भारतात या बिया विविध व्यंजने, आयुर्वेदिक औषधात आणि धार्मिक पूजाविधीसाठी वापरल्या जातात.

चीन, जपान आणि परिसरातील देशात बियांचा सर्वात सामान्य वापर कमळाच्या बियांच्या पेस्ट स्वरूपात केला जातो, जो चायनीज पेस्ट्रीमध्ये तसेच जपानी मिष्टान्नांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातो. वाळलेल्या कमळाच्या बिया वापरण्यापूर्वी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवाव्यात. चांगल्या मुरल्या नंतर त्या थेट सूप आणि कॉंजीमध्ये किंवा इतर विविध पदार्थांमध्ये टाकल्या जातात. ताज्या कमळाच्या बिया बीजथळीच्या स्वरूपात विकल्या जातात. ही बीजथली शंकूच्या आकाराची किंवा भोवऱ्याच्या आकाराची असून त्यातील एक एक बी काढून कच्च्या स्वरूपात खाल्ल्या जातात. यॉन्गफेंग चिली सॉस आणि चांग्शा गंधयुक्त टोफूसह झियांगटान किंवा 'झियांगलियन कमळाच्या' बियांना एकत्रितपणे "हुनान सॅनबाओ" किंवा हुनानचे तीन खजिना असे संबोधून खाल्ले जातात.[][][][][]


कोलंबियाच्या उत्तरेकडील भागात, विशेषतः बॅरनक्विला आणि कार्टाजेना सारख्या शहरांमध्ये कमळाच्या बिया खाणे ही सामान्य बाब आहे. स्थानिक लोक सामान्यतः कमळाच्या बियांना "मार्टिलो" म्हणून संबोधतात.


जगात अनेक ठिकाणी ताज्या कमळाच्या बिया रस्त्यावरील बाजारात विकल्या जातात आणि सामान्यतः स्थानिक लोक त्या कच्च्या स्वरूपात खातात.

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "Lotus seeds, dried, per 100 g (from pick list)" (इंग्रजी भाषेत). Nutritiondata.com for the USDA National Nutrient Database, version SR-21. 2014. २० मे २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ "Yongfeng hot sauce". www.cgi.gov.cn. 2019-03-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-05-03 रोजी पाहिले.
  3. ^ "Xianglian". www.cgi.gov.cn. 2020-05-03 रोजी पाहिले.[permanent dead link]
  4. ^ Gangjee, Dev S. (2016-02-26). Research Handbook on Intellectual Property and Geographical Indications (इंग्रजी भाषेत). Edward Elgar Publishing. ISBN 978-1-78471-947-0.
  5. ^ Calboli, Irene; Ng-Loy, Wee Loon (2017-06-16). Geographical Indications at the Crossroads of Trade, Development, and Culture: Focus on Asia-Pacific (इंग्रजी भाषेत). Cambridge University Press. ISBN 978-1-316-73884-9.
  6. ^ Guo, Ying; Ding, Xiaoxiao; Ni, Yongnian (2017). "The combination of NIR spectroscopy and HPLC chromatography for differentiating lotus seed cultivars and quantitative prediction of four main constituents in lotus with the aid of chemometrics". Analytical Methods (इंग्रजी भाषेत). 9 (45): 6420–6429. doi:10.1039/C7AY02021J. ISSN 1759-9679.