Jump to content

कमल परदेशी

कमल परदेशी

पुणे जिल्ह्यातील मसाला क्वीन
कार्यकाळ
०३ नोव्हेंबर २००० – ०२ जानेवारी २०२४

जन्म १ जून १९६१ (1961-06-01)
सोनगाव,बारामती महाराष्ट्र (राज्य) भारत
मृत्यू २ जानेवारी, २०२४ (वय ६२)
पुणे, भारत
धर्म बौद्ध

कमलताई परदेशी ह्या दक्षिण आशियामधील भारत देशामधील महाराष्ट्र राज्यामधील पुणे जिल्ह्यातील एक सामान्य गरीब कुटुंबातील महिला जीने सोनगाव तालुका बारामती येथील छोट्याश्या खेड्यात १ जून १९६१ जन्म घेऊन कोणतेही शिक्षण न घेता आपल्या कर्तुत्वाच्या व हिमतीच्या जोरावर एक असामान्य असे शिखर गाठत आपला छाप या जगात उमटवला.व आपल्या कामाची शब्बासकी मिळवत असंख्य अश्या शासकीय निमशासकीय संस्था कडून बक्षिसे व पारितोषिके मिळवत स्वतची पाठ थोपटवून घेतली. शेतमजूर महिला ते उद्योजिका असा थक्क करणारा त्यांचा प्रवास आहे. खुटबाव व भांडगाव परिसरातील खुरपणी करणाऱ्या १० महिलांची एकजूट करून त्यांनी भांडगाव (ता.दौंड) येथे श्री अंबिका महिला सहकारी औद्योगिक संस्थेचे उभारणी केली. त्यानंतर व्यवसाय वाढल्याने घरातील २०० महिलांना अंबिका महिला बचत गट व‌ अंबिका महिला औद्योगिक संस्थेच्या माध्यमातून रोजगार मिळवून दिला. महिलांना रोजगार मिळण्यासाठी सुरुवातीस स्वतःच्या घरी मसाले तयार करत त्यांनी बँकेच्या माध्यमातून कर्ज उभारून अंबिका औद्योगिक संस्थेची स्थापना केली व दर्जेदार मसाला उत्पादनात सुरुवात झाली. मसाले व्यवसाय सातासमुद्रापार नेण्यामध्ये त्या यशस्वी झाल्या. आज अंबिका नावाने ब्रँडने प्रचलित मसाला जगभरात नऊ देशामध्ये विकला जात आहे. त्यांचे अंबिका मसाले नावाने ३२ फ्लेवर मार्केटमध्ये विकले जात आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत नाबार्ड ने त्यांना जागतिक आर्थिक शिखर परिषदेतर्फे सन्मानित केले. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते रणरागिणी पुरस्कार त्यांना मिळाला. त्यांना २०२१ मध्ये आयसीएसआरचा पुरस्कार मिळाला होता. याशिवाय सावित्री सन्मान असोशिएशन व सेवाश्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार अशा अनेक त्यांना सन्मानित करण्यात आले.


कमलताई परदेशी यांचा मृत्यु ह्या पुण्याच्या ससून रुग्णालयात त्या ५० ते ६० दिवसांपासून कर्करोगाशी झुंजत होत्या. त्यांनी मंगळवारी (ता.२जानेवारी २०२४) दुपारी एक वाजता अखेरचा श्वास घेतला. रात्रीच्या सुमारास खुटबाव येथे त्यांच्यावर असंख्य जनसमुदयाच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पाठीमागे पती, तीन विवाहित मुली, नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने पुणे जिल्हयात शोककळा पसरली होती .


बाह्य दुवे

  • Majha Katta (बचत गटातून उद्योगभरारी 'अंबिका' मसाले देशविदेशात पोहोचवणाऱ्या Kamlatai Pardeshi - ABP MAJHA)
  • Shivar News (अंबिका मसाले उद्योग पोचला विदेशात | Masala Queen Kamal Pardeshi | Ambika Masale Udyog | Shivar News)
  • LokShahi News (Kamlatai Pardeshi | कमलताई परदेशी यांचा लोकशाही पुणे रत्न सन्मान 2021 पुरस्कार देऊन सन्मान...)