कमला सोहोनी
Indian biochemist (1911–1998) | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
स्थानिक भाषेतील नाव | कमला सोहनी | ||
---|---|---|---|
जन्म तारीख | जून १८, इ.स. १९११, इ.स. १९१२ इंदूर | ||
मृत्यू तारीख | जून २८, इ.स. १९९८ नवी दिल्ली | ||
नागरिकत्व |
| ||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय |
| ||
पुरस्कार |
| ||
| |||
कमलाबाई सोहोनी (१८ जून १९११ - २८ जून १९९८) या भारतातील पहिल्या विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवीधारक शास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत.[१][२]
शिक्षण
पीएच.डी(केंब्रिज इंग्लंड) १९३९[३]
कमला सोहोनींना मिळालेल्या शिष्यवृत्ती
- सत्यवती लल्लूभाई सामळदास शिष्यवृत्ती, १९३१.
- टेक्निकल रिसर्च स्कॉलरशिप, बॉंबे प्रेसिडेन्सी, १९३३.
- स्पिंगर रिसर्च स्कॉलरशिप, १९३७.
- सर मंगळदास नथूभाई फ़ॉरिन एज्युकेशन स्कॉलरशिप, १९३७.
- इन्टरनॅशनल फ़ेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी विमेन(अमेरिकेची संयुक्त संस्थाने)ची ट्राव्हेलिंग स्कॉलरशिप, १९३८
शिक्षण व त्यासाठीचा संघर्ष
ब्रिटिश अंकित राष्ट्रातली एक हिंदुस्थानी मुलगी म्हणून त्यांना आपल्या शिक्षणासाठी संघर्ष करावा लागला. इसवी सन १९३३ मध्ये रसायनशास्त्र हा विषय घेऊन त्या पहिल्या वर्गात बी.एस्सी.ची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यांनी वर्तमानपत्रातीत जाहिरातीनुसार शास्त्रीय संशोधनासाठी बंगलोर येथील 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ़ सायन्स'मध्ये अर्ज केला. टाटांनी १९११ मध्ये स्थापन केलेल्या या संस्थेत प्रवेश मिळणे अत्यंत प्रतिष्ठेचे समजले जाई. प्रवेशासाठी कमलाबाई पूर्णपणे पात्र होत्या, परंतु संस्थेचे प्रमुख, नोबेल पारितोषिक विजेते सर सी.व्ही. रामन यांनी 'मुलगी असल्याने प्रवेश देता येत नाही' असे कमलाबाईंना कळविले. कमलाबाई श्री. रामन यांना प्रत्यक्ष भेटल्या व 'मुलगी म्हणून माझ्यावर होणारा अन्याय मी कदापि सहन करणार नाही,आणि इथे राहून मी संशोधन करून एम.एस्सी. होणारच.' असे ठामपणे सांगितले. श्री. रामन यांनी कमलाबाईंच्या हट्टास्तव त्यांना एका वर्षासाठी प्रवेश दिला.[४] मग वर्षभर कमलाबाईंनी बायोकेमिस्ट्री या विषयाचा झपाटून अभ्यास केला. वर्षअखेर रामन त्यांना म्हणाले. तुमची निष्ठा आणि चिकाटी पाहून असे वाटते की, यापुढे संस्थेत फक्त मुलींनाच प्रवेश द्यावा.'
परदेशातील शिक्षण
पुढे १९३७ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या 'स्प्रिंगर रिसर्च' आणि 'सर मंगलदास नथूभाई' या शिष्यवृत्त्या मिळवून कमला सोहोनी इंग्लंडला गेल्या. तिथे केंब्रिजमधील जगप्रसिद्ध सर विल्यम डन लॅबॉरेटरीचे डायरेक्टर, नोबेल पारितोषिकविजेते सर फ़्रेड्रिक गॉलन्ड हॉपकिन्स यांना भेटून, संस्थेत प्रवेश देण्याची विनंती केली. त्यावर त्यांनी 'माझ्या प्रयोगशाळेतील सर्व जागा भरल्या आहेत, तुलाच जागा मोकळी दिसली तर सांग' असे सांगितले. कुणाचीच ओळख नसल्याने बाई हताश झाल्या, तेव्हाच तेथील एक शास्त्रज्ञ डॉक्टर रिक्टर यांनी त्यांना आपली जागा देऊ केली. दिवसा त्या जागेवर, सकाळी आठ ते संध्याकाळी पाचपर्यंत बाई काम करीत, आणि रात्री डाॅ. रिक्टर. पहिले सत्र संपायला केवळ दोन-तीन दिवस बाकी असताना कमलाबाईंनी केंब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला आणि 'प्राणिमात्रांप्रमाणे सर्व वनस्पतीतीलही साऱ्या जीवनक्रिया 'सायटोक्रोन-सी'च्या मध्यस्थीने एन्झाइम्समुळे होतात, हे मूलभूत महत्त्वाचे संशोधन सादर करून १९३९ साली केंब्रिज विद्यापीठाची विद्यावाचस्पती (पीएच्.डी.) ही पदवी संपादन केली. इतरांचे प्रबंध हजार-पंधराशे पानांचे असताना, कमलाबाईंचा प्रबंध अवघ्या ४० पानांचा होता आणि तो त्यांनी त्यावेळी एका व्याख्यानाद्वारे सभागृहापुढे ठेवला.[४]
मायदेशी परत
त्यानंतर अनेक शास्त्रज्ञाच्या आग्रहाला बळी पडून पुढील संशोधनासाठी इंग्लंडमध्ये न राहाता, डॉ कमलाबाई मायभूमीच्या प्रेमाने भारतात परत आल्या. दिल्लीच्या 'लेडी हार्डिंग्ज कॉलेज' व पुढे मुंबईच्या (रॉयल) इन्स्टिट्यूट ऑफ़ सायन्स' या संस्थेत त्यांनी काम केले. मुंबईच्या याच संस्थेच्या निदेशक म्हणून त्या निवृत्त झाल्या. 'लेडी हार्डिंग्ज कॉइलेजमधली जीवरसायनशास्त्राच्या प्राध्यापकाची त्यांची नोकरी, डॉ. हॉपकिन्स यांच्या सूचनेनुसार १९३८ सालापासून कमलाबाईंकरिता राखून ठेवण्यात आली होती. इंग्लंडहून आल्यावर १९३९ मध्ये, सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात त्या आपल्या नोकरीवर रूजू झाल्या.
सन्मान
- लीग ऑफ नेशन्समध्ये भारत, इंग्लंड व अमेरिका या तिन्ही देशांच्या विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व, (लक्झेंबर्ग), १९३८.
- राष्ट्रपती पदक प्राप्त.[४]
संशोधन
- भारतीय विज्ञान संस्था, बेंगलोर, भारत : दुधातील व कडधान्यांतील प्रथिनांचे पृथक्करण. ह्युमनायझेशन ऑफ बफेलो मिल्क.
- सर विल्यम डन इन्स्टिट्यूट ओफ़ बायोकेमिस्ट्री, केंब्रिज, इंग्लंड : वनस्पतीमध्ये 'सायटोक्रोम'चा शोध. या शोधाबद्दल केंब्रिज विद्यापीठाने पीएच.डी पदवी दिली. आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ जगतात नाव झाले.
- न्यूट्रिशन रिसर्च लॅब, कुन्नूर, भारत : तोसला यीस्ट जीवनसत्त्व "प"चा शोध.
- भारतीय विज्ञान संस्था, मुंबई, भारत: कडधान्यांमधील ट्रिप्सीन इनहिबिटर्स. आरे दूध कॉलनीतील दूध, गुरांचे गवत. वासरांचा आहार, धानआट्यातील पौष्टिक घटक, नीरा या पेयातील उपयुक्त घटक, त्यांचे माणसांवर परिणाम. नीरा संशोधनाबद्दल त्या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट संशोधनाबद्दलचे राष्ट्रपती पारितोषिक मिळाले.[२]
मार्गदर्शक म्हणून काम
या सर्व संशोधनांत सहभागी होणाऱ्या त्यांच्या २५ विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाकडून एम.एस्सी. व १७ विद्यार्थ्यांना पीएच.डी पदवी मिळाली.
निवृत्तीनंतरचे संशोधन
१९६९ मध्ये निवृत्त झाल्यावर स्वयंपाकघरात तयार होणाऱ्या खाद्यपदार्थांवर संशोधन करून डॉ. कमलाबाई सोहोनींनी अनेक लेख लिहिले. त्यांचे एक पुस्तक आहार-गाथा या नावाने प्रसिद्ध झाले आहे.
भूषविलेली पदे
- बायोकेमिस्ट्री(जीवरसायनशास्त्र) विभागाच्या पहिल्या प्राध्यापक व प्रमुख : लेडी हार्डिंग्ज कॉलेज, दिल्ली, भारत.
- उपनिदेशक : न्य़ूट्रिशन रिसर्च लॅब, कुन्नूर, भारत.
- निदेशक : भारतीय विज्ञान संस्था,बेंगलोर, भारत.
- अध्यक्ष : ग्राहकसंघ, (कन्झ्यूमर्स सोसायटी ऑफ इंडिया), मुंबई.
इतर कामगिरी
- दिल्ली, बडोदा आणि मुंबई विद्यापीठात जीवरसायनशास्त्राच्या विभागांची संस्थापना(संपूर्ण नियोजन आणि उभारणी).
- मुंबईच्या हाफकिन इन्स्टिट्यूटची पुनर्रचना समिती, मुंबई विद्यापीठाचे सिनेट, इंडियन पब्लिक सर्व्हिस कमिशन वगैरेंवर काम केले.
- कन्झ्यूमर्स गायडन्स सोसायटीच्या कामात प्रत्यक्ष मोठा सहभाग घेतला.
- विविध अभ्यासपूर्ण १५५ शोधनिबंधांचे लेखन[४]
- टेनिसच्या खेळात प्रतिष्ठेच्या सामन्यांत ट्रॉफ़ीज प्राप्त.
नातेवाईक
प्रसिद्ध विद्वान मराठी लेखिका दुर्गा भागवत या कमला सोहोनींच्या भगिनी होत्या. आचार्य राजारामशास्त्री भागवत हे कमला सोहोनींच्या आजीचे बंधू होते.
कमला सोहोनींवरील मराठी पुस्तके
- विज्ञान विशारदा : कमला सोहोनी (वसुमती धुरू)
संदर्भ
- ^ Pal, Sanchari. "How Kamala Sohonie Defied Gender Bias & Became the First Indian Woman Ph.D in Science".
- ^ a b "History of Scientific Women".
- ^ Information, Reed Business (1982-08-19). New Scientist (इंग्रजी भाषेत). Reed Business Information.
- ^ a b c d "सरस्वतीची सुकन्या". १८.६.२०१६.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)