कभी कभी
कभी कभी | |
---|---|
दिग्दर्शन | यश चोप्रा |
निर्मिती | यश चोप्रा |
प्रमुख कलाकार | वहिदा रेहमान शशी कपूर अमिताभ बच्चन राखी गुलजार नीतू सिंग ऋषी कपूर |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | २७ फेब्रुवारी १९७६ |
कभी कभी (मराठी: कधी कधी) हा एक १९७६ साली प्रदर्शित झालेला भारतीय हिंदी-भाषेतील यश चोप्रा ह्यांनी दिग्दर्शित व निर्मितीत केलेला चित्रपट आहे. ह्या चित्रपटात वहिदा रेहमान, शशी कपूर, अमिताभ बच्चन, राखी गुलजार, नीतू सिंग व ऋषी कपूर ह्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.
पार्श्वभूमी
कथानक
कभी कभी ही गोष्ट कवी अमित (अमिताभ बच्चन) व सुंदर पूजा (राखी गुलजार) हे दोघं एकत्रितपणे एक परिपूर्ण भविष्याची कशी कल्पना करतात याच्याबद्दल आहे, पण नियतीच्या इतर योजना असतात कारण पूजा तिच्या आईवडिलांच्या इच्छेला झुकते व विजय (शशी कपूर) ह्याचाशी लग्न करते. अंजली (वहिदा रेहमान) हिच्याशी लग्न करून पूजाला विसरण्याच्या एका व्यर्थ व अयशस्वी प्रयत्नात अमित आपल्या कवितांपासून दुरावतो, पण असं अमित व पूजाचे आयुष्य किती चित्र परिपूर्ण आहे? सुमारे २० वर्षांनी... पुढच्या पिढीपर्यंत पसरलेले, पूजा व विजयचा मुलगा विकी (ऋषी कपूर) व अंजलीची अमितच्या आधीच्या नात्यापासून असलेली मुलगी पिंकी (नीतू सिंग) हे दोघं प्रेमात पडतात. अनेक घटनांची साखळी जुन्या प्रेमींना मित्र म्हणून एकत्र आणते. कभी कभी ही पिढीजात प्रेमकथा आहे व असा चित्रपट आहे जो घडतो केवळ "कधी कधी".
कलाकार
- वहिदा रेहमान - अंजली मल्होत्रा
- शशी कपूर - विजय खन्ना
- अमिताभ बच्चन - अमित मल्होत्रा
- राखी गुलजार - पूजा खन्ना
- नीतू सिंग - पिंकी कपूर
- ऋषी कपूर - विक्रम खन्ना (ऊर्फ विकी)
- सिमी गरेवाल - शोभा कपूर
- परीक्षित सहानी - डॉ. आर. पी. कपूर
- इफ़तेखार - श्री. मल्होत्रा
- देवेन वर्मा - रामभजन