Jump to content

कपासे

  ?कपासे

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ.२८१९४ चौ. किमी
जवळचे शहरपालघर
जिल्हापालघर जिल्हा
लोकसंख्या
घनता
१,६८९ (२०११)
• ५,९९१/किमी
भाषामराठी
सरपंचरेश्मा कोम
बोलीभाषाआदिवासी,वाडवळी
कोड
पिन कोड
दूरध्वनी
• आरटीओ कोड

• ४०११०२
• +०२५२५
• एमएच४८

कपासे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

सफाळे रेल्वे स्थानकापासून पश्चिमेला रामबाग मार्गाने गेल्यावर डावीकडे जाणाऱ्या फाट्यावर हे गाव लागते. सफाळे रेल्वे स्थानकापासून हे गाव २.६ किमी अंतरावर आहे.

हवामान

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.

लोकजीवन

हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ४१२ कुटुंबे राहतात. एकूण १६८९ लोकसंख्येपैकी ८४२ पुरुष तर ८४७ महिला आहेत. गावाची साक्षरता ७७.८९ टक्के आहे.पुरुष साक्षरता ८६.५८ आहे तर स्त्री साक्षरता ६९.०७ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या १५१ आहे. ती एकूण लोकसंख्येच्या ८.९४ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी आणि वाडवळ समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात दुग्ध व्यवसाय,कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा ते करतात.

नागरी सुविधा

गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस सफाळे रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. ऑटोरिक्शासुद्धा सफाळे रेल्वे स्थानकावरून दिवसभर उपलब्ध असतात.

जवळपासची गावे

उसरणी,दहिसर तर्फे माहीम, टिघरे, आंबोडेगाव, आगरवाडी, पारगाव, सोनावे, उछवली, सफाळे, कर्दळ, माकणेकापसे ही जवळपासची गावे आहेत.

संदर्भ

1. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

2. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html

३.

http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc