कन्नड ब्राह्मण
कन्नड ब्राह्मण (कानडी ब्राह्मण) ही कर्नाटकातील विविध ब्राह्मण पोटजातींना सामावून घेणारी एक समूहवाचक संज्ञा आहे. तेलंगी ब्राह्मण, दक्षिणी ब्राह्मण या अशाच समूहवाचक समज्ञा आहेत.
यांच्यांत तीन पंथ आढळतात -
- माध्व - मध्वाचार्यांच्या द्वैतवादाचे अनुचरण करणारे भक्तिमार्गी वैष्णव
- वैष्णव - रामानुजाचार्यांच्या विशिष्टाद्वैतवादाचे अनुचरण करणारे
- स्मार्त - आदि शंकराचार्यांच्या अद्वैतवादाचे अनुचरण करणारे