कनेटिकट
कनेटिकट Connecticut | |||||||||||
अमेरिका देशाचे राज्य | |||||||||||
| |||||||||||
अधिकृत भाषा | इंग्लिश | ||||||||||
राजधानी | हार्टफर्ड | ||||||||||
मोठे शहर | ब्रिजपोर्ट | ||||||||||
क्षेत्रफळ | अमेरिकेत ४८वा क्रमांक | ||||||||||
- एकूण | १४,३५७ किमी² | ||||||||||
- रुंदी | ११३ किमी | ||||||||||
- लांबी | १७७ किमी | ||||||||||
- % पाणी | १२.६ | ||||||||||
लोकसंख्या | अमेरिकेत २९वा क्रमांक | ||||||||||
- एकूण | ३५,७४,०९७ (२०१० सालच्या गणनेनुसार) | ||||||||||
- लोकसंख्या घनता | २७१/किमी² (अमेरिकेत ४वा क्रमांक) | ||||||||||
- सरासरी उत्पन्न | $६८,५९५ | ||||||||||
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश | ९ जानेवारी १७८८ (५वा क्रमांक) | ||||||||||
संक्षेप | US-CT | ||||||||||
संकेतस्थळ | www.ct.gov |
कनेटिकट(अमेरिकन उच्चार) किंवा कनेटिकट(मराठी उच्चार) (इंग्लिश: Connecticut; उच्चार ) हे अमेरिका देशामधील आकाराने तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात लहान राज्य आहे. अमेरिकेच्या ईशान्य भागातील न्यू इंग्लंड प्रदेशात वसलेले कनेटिकट लोकसंख्येच्या दृष्टीने देशातील २९व्या क्रमांकाचे व चौथ्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या घनतेचे राज्य आहे.
कनेटिकटच्या दक्षिणेला अटलांटिक महासागर, पश्चिमेला न्यू यॉर्क, उत्तरेला मॅसेच्युसेट्स व पूर्वेला ऱ्होड आयलंड ही राज्ये आहेत. राज्याच्या दक्षिणेला खाडीपलीकडे न्यू यॉर्क शहराचे लॉंग आयलंड हे बेट आहे. हार्टफर्ड ही कनेटिकटची राजधानी तर ब्रिजपोर्ट हे सर्वात मोठे शहर आहे. कनेक्टिकचा राज्याचा दक्षिण व पश्चिमेकडील मोठा भाग न्यू यॉर्क महानगरामध्ये गणला जातो.
कनेटिकट हे अमेरिकेमधील एक प्रगत व श्रीमंत राज्य आहे. दरडोई उत्पन्न, कौटुंबिक उत्पन्न व मानवी विकास निर्देशांक ह्या बाबतीत कनेटिकटचा देशात प्रथम क्रमांक लागतो. परंतु येथील श्रीमंत व गरीब लोकांच्या मिळकतीत फार मोठी तफावत आहे. बँकिंग व इतर आर्थिक सेवा हा येथील सर्वात मोठा उद्योग आहे.
न्यू इंग्लंडमधील इतर राज्यांप्रमाणे येथे युरोपियन वंशाचे अनेक लोक स्थायिक झाले आहेत.
मोठी शहरे
- ब्रिजपोर्ट - १,४४,२२९
- न्यू हेवन - १,२९,७७९
- हार्टफर्ड - १,२४,५१२
- स्टॅमफर्ड - १,२२,६४३
इतर शहरे
- अनसोनिया
- ग्रोटॉन शहर
- टॉरिंग्टन
- डर्बी
- डॅनबरी
- नॉर्विक
- नॉर्वोक
- न्यू कनान
- न्यू ब्रिटन
- न्यू लंडन
- ब्रिस्टल
- मिडलटाउन
- मिलफोर्ड
- मेरिडेन
- वेस्ट हेवन
- वॉटरबरी
- शेल्टन
गॅलरी
- न्यू हेवन.
- कनेटिकटमधील प्रमुख रस्ते व महामार्ग.
- कनेटिकट राज्य विधान भवन.
- कनेटिकटचे प्रतिनिधित्व करणारे २५ सेंट्सचे नाणे.