Jump to content

कणा (कविता)

कुसुमाग्रज म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर.कुसुमाग्रजांचा जन्मदिवस,२७,फेब्रुवारी, हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. याचे कारण म्हणजे कुसुमाग्रजांचे मराठी साहित्यातील योगदान होय. लहानपणी त्यांची वाचलेली 'कणा' ही कविता आजही आनंद देते. 'कुसुमाग्रज' म्हणजे कुसुम+आग्रज=कुसुम ही विष्णू वामन शिरवाडकर यांची धाकटी बहीण तिच्या आधी जन्मलेले म्हणून 'कुसुमाग्रज'असे टोपण नाव त्यांनी धारण केले. यात त्यांचं बहिणीबाबत प्रेम व्यक्त होते. कुसुमाग्रजांचे मराठी साहित्यातील योगदान पाहून त्यांना'ज्ञानपीठ'पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच त्यांचा जन्मदिवस हा दरवर्षी जागतिक 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. कणा ही कविता जुन्या अभ्यासक्रमाच्या नववीच्या पाठयपुस्तकात होती. या कवितेचं वैशिष्ट्य असे की यात कुठेही महापुराचा उल्लेख नसतानाही वाचक महापुरात लोटले जातात आणि त्या महापुरातून प्रसन्न मुद्रेत ताठ कण्याने सामोरे जातात.'मुक्तहस्त'अलंकाराने नटलेली ही कविता आहे. आजही तिच्या ओळ्या सहज स्फुरतात. "ओळखलंत का सर मला, पावसात आलं कोणी कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी"

ठळक मजकूर