कडी-कोयंडा
दोन वस्तू किंवा पृष्ठभाग (उदा. दार व दाराची चौकट) जोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनाला कडी-कोयंडा असे म्हणतात. कोयंड्यातून कडी काढल्यावर गरजेप्रमाणे दोन वस्तू किंवा पृष्ठभाग वेगळे करता येतात. कडीला इंग्रजीत staple किंवा कडी जर साखळीसारखी असेल तर fastening chain म्हणतात आणि कोयंड्याला hasp. कोयंड्याला कुलूप लावता येते.
आणखी शब्द : लाकडी पेटीचे दार घट्ट बंद करायच्या छोट्या stapleला खिट्टी म्हणतात. असल्या खिट्टीला कुलूप लावता येते. दरवाजा वरच्या फ्रेमला जोडून घट्ट करण्यासाठी जो उभा bolt असतो त्याला टॉवरबोल्ट, आणि दरवाज्याची दोन कवाडे एकमेकांना, किंवा एकुलते कवाड आणि बाजूची उभी फ्रेम यांना जोडणाऱ्या आडव्या boltला अलड्रॉप म्हणतात. कपाटाचे कवाड वरच्या आडव्या पट्टीशी जखडणाऱ्या छोट्या टॉवरबोल्टलाही खिट्टी म्हणतात, पण जर असा बोल्ट खालच्या बाजूला असेल तर त्याला लोअरबोल्ट म्हणतात. टॉवरबोल्ट किंवा लोअरबोल्ट यांना कुलूप लावता येत नाही; अलड्रॉपला कुलूप लावता येते.
खिडकी बंद होऊ नये म्हणून, किंवा हलक्या वजनाचा दरवाजा बंद ठेवण्यासाठी जी छोटी कडी असते तिला hook आणि ती ज्याच्यात अडकवतात त्याला eye म्हणतात. हूक ॲन्ड आय नेहमी जोडीने असतात.
एकफळी(एक-कवाडी) दरवाज्यांना बाजूच्या उभ्या फ्रेमशी जोडण्यासाठीच्या अंगच्या कुलपाला अंगटाळे doorlatch किंवा नुसतेच latch म्हणले जाते.
वाड्याच्या मोठ्या जाडजूड दरवाज्याला घट्ट बंद करण्यासाठी जो कोलदांडा किंवा आडणा असतो, त्याला इंग्रजीत crossbar म्हणतात.