Jump to content

कंबरलँड नदी

कंबरलॅंड नदी अमेरिकेच्या केंटकी आणि टेनेसी राज्यांतील मोठी नदी आहे. ही नदी ॲपेलेशियन पर्वतरांगेत उगम पावते व पाडुका शहराजवळ ओहायो नदीला मिळते. कंबरलॅंड नदीचा प्रवाह १,१०७ किमीचा असून पाणलोट क्षेत्र सुमारे ४७,००० किमी आहे. या नदीवर अनेक बंधारे आहेत. यांचा उपयोग सिंचनाशिवाय पूरनियंत्रणासाठी होतो.

नॅशव्हिल आणि क्लार्क्सव्हिल शहरे या नदीकाठी आहेत.