Jump to contentकंपनीच्या संचालकांची कामे
- कंपनी नियमावलीत नमूद केलेली संचालकाची कार्ये.
- कंपनी संचालकाने कंपनीच्या उदेद्श प्राप्तीसाठी तसेच कंपनीशी निगडीत कंपनीचे सदस्य, कर्मचारी, भागधारक, समाज व पर्यावरण या सर्वांच्या हीतरक्षणासाठी कार्य केले पाहिजे.
- कंपनी संचालकाने आपले कार्य पार पाडताना पुरेसे कौशल्य, निर्णय स्वातंत्र यांचा वापर केला पाहिजे व पुरेशी दक्षता बाळगली पाहिजे.
- कंपनी हिताच्या आड येणाऱ्या अथवा येऊ शकणाऱ्या कोणत्याही परिस्थितीमध्ये कंपनी संचालकाने प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरीत्या सहभाग घेणे टाळले पाहिजे.
- कंपनी संचालकाने तो स्वतः, त्याचे नातेवाईक, भागीदार किंवा सहकारी यांना गैरमार्गाने कोणताही फायदा अथवा लाभ पोहोचवू नये अथवा त्यासाठी प्रयत्न करू नये. सदर बाबतीत संचालक दोषी आढळल्यास अशा फायद्याच्या र्क्मेइत्की रक्कम तो कंपनीला देय राहील.
- संचालकाने आपली कार्ये अथवा कर्तव्ये दुसऱ्या कुणाला नेमून देऊ नयेत, असे केल्यास सदर कार्य व्यर्थ ठरतील.