औंध संस्थान
औंध संस्थान | ||||
| ||||
| ||||
राजधानी | औंध | |||
सर्वात मोठे शहर | औंध | |||
शासनप्रकार | राजतंत्र | |||
राष्ट्रप्रमुख | पहिला राजा: श्री परशुराम त्रिंबक पंत प्रतिनिधी (इ.स.१६९७-१७१७) अंतिम राजा: श्री भवानराव श्रीनिवासराव पंत प्रतिनिधी (इ.स. १९३७-४७) | |||
पंतप्रधान | परशुरामराव पंत (इ.स.१९४४-१९४८) | |||
अधिकृत भाषा | मराठी भाषा | |||
लोकसंख्या | 58,916 (इ.स.१८८१) | |||
–घनता | ४५.४ प्रती चौरस किमी |
औंध संस्थान महाराष्ट्रातील एक संस्थान होते. महाराष्ट्रात ते सातारा औंध या नावाने परिचित आहे. औंध संस्थान हे ब्रिटिश भारतातील मुंबई इलाख्यातील डेक्कन स्टेट्स एजन्सीतील एक संस्थान होते. या संस्थानाची स्थापना सन १६९९ या वर्षी झाली.या संस्थानाची पूर्वीची राजधानी कराड ही होती.
संस्थानिक
औंध संस्थानाची स्थापना परशुराम त्रिंबक पंतप्रतिनिधी यांनी केली. ते देशस्थ ब्राह्मण होते.
औंध संस्थानाचे राजे
भवानराव पंतप्रतिनिधी
औंध संस्थानचे राजे भवानराव पंतप्रतिनिधी हे धार्मिक होते, पण दैववादी नव्हते. मानवी सामर्थ्यावर व कर्तृत्वावर त्यांचा विश्वास होता. उद्योगाचे महत्त्व त्यांना पुरेपूर पटलेले होते. बहात्तर खेडी आणि अठ्ठेचाळीस वाड्या एवढाच विस्तार असलेले आपले संस्थान उद्योग-व्यवसायांनी फुलावे, फळावे असे स्वप्न त्यांनी पाहिले. संस्थानांतील शाळांमधून तंत्रशिक्षण देण्यावर त्यांचा कटाक्ष होता.या संस्थानमधील श्री.श्री.विद्यालयातून साने गुरुजी ,ग.दि.माडगूळकर,व्यंकटेश माडगूळकर,शंकरराव खरात,मधुकर पाठक (चित्रपट क्षेत्रातील)यांनी शिक्षण घेतले.
स्वदेशी वस्तू हा भवानराव पंतप्रतिनिधींचा जिव्हाळ्याचा विषय होता. संस्थानात शेतांत पिकलेले धान्यच त्यांच्या भोजनात असे. संस्थानामधील विणकरांनी विणलेली साधी वस्त्रेच ते परिधान करीत. सूर्यनमस्कार या जुन्या व्यायामप्रकाराचे त्यांनी शास्त्रशुद्ध संशोधन करून पुनरुज्जीवन केले. ते स्वतः सूर्यनमस्कार घालीत. संस्थानातील शालेय विद्यार्थीही हा व्यायाम करीत . त्यांच्या या सूर्यनमस्कार ‘वेडा’वर आचार्य अत्र्यांनी ‘साष्टांग नमस्कार’ नावाचे नाटक लिहिले. भवानरावांनी ‘बिन भिंतीचा तुरुंग’ ही मॉरिस फ्रेडमन नावाच्या आयरिश माणसाची कल्पना त्यांनी प्रत्यक्षात आणली. उघड्यावर असलेली ती खुनी गुन्हेगारांची वसाहत पुढे ‘स्वतंत्रपूर’ या नावाने ओळखली जाऊ लागली. व्ही.शांताराम यांनी याच संकल्पनेवर ‘दो ऑंखे बारा हाथ’ नावाचा हिंदी चित्रपट काढला. हा चित्रपट जगभरात नावाजला गेला.आजही आटपाडी येथे 'बिन भिंतीचा तुरुंग 'आहे .
भवानरावांना साहित्य, संगीत, शिल्प, चित्र यांची विशेष आवड होती. दर वर्षी राजेसाहेब औंधमध्ये कला प्रदर्शन भरवीत. ते स्वतः चित्रकार होते .त्यांनी काढलेली चित्रे औंधच्या संग्रहालयात आजही आहेत.त्यांनी राजे-रजवाड्यांकडून जुनी चित्रे विकत घेतली. परदेशी जाऊन पाश्चात्त्य चित्रकारांची काही चित्रे भारतात आणली. काही दुर्मीळ चित्रांच्या नकला करवून आणल्या. आणि या चित्रा-शिल्पांसाठी औंधमध्ये ए्क वैशिष्ट्यपूर्ण संग्रहालय उभारले.
संदर्भ आणि नोंदी
- ^ a b c Worldstatesmen.org Indiase prinsen A-J
- ^ Encyclopædia Britannica, eleventh edition (1910-1911)