ओरेगन
ओरेगन Oregon | |||||||||||
अमेरिका देशाचे राज्य | |||||||||||
| |||||||||||
अधिकृत भाषा | इंग्लिश | ||||||||||
राजधानी | सेलम | ||||||||||
मोठे शहर | पोर्टलंड | ||||||||||
क्षेत्रफळ | अमेरिकेत ९वा क्रमांक | ||||||||||
- एकूण | २,५५,०२६ किमी² | ||||||||||
- रुंदी | २४० किमी | ||||||||||
- लांबी | ५८० किमी | ||||||||||
- % पाणी | २.४ | ||||||||||
लोकसंख्या | अमेरिकेत २७वा क्रमांक | ||||||||||
- एकूण | ३८,३१,०७४ (२०१० सालच्या गणनेनुसार) | ||||||||||
- लोकसंख्या घनता | १५.४/किमी² (अमेरिकेत ३९वा क्रमांक) | ||||||||||
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश | १४ फेब्रुवारी १८५९ (३३वा क्रमांक) | ||||||||||
संक्षेप | US-OR | ||||||||||
संकेतस्थळ | www.oregon.gov |
ओरेगन (इंग्लिश: Oregon, { उच्चार ) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या वायव्य (पॅसिफिक नॉर्थवेस्ट) भागात वसलेले ओरेगन क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील नववे तर लोकसंख्येच्या दृष्टीने २७व्या क्रमांकाचे राज्य आहे.
ओरेगनच्या पश्चिमेला प्रशांत महासागर, पूर्वेला आयडाहो, दक्षिणेला कॅलिफोर्निया व नेव्हाडा तर उत्तरेला वॉशिंग्टन ही राज्ये आहेत. सेलम ही ओरेगनची राजधानी तर पोर्टलंड हे सर्वात मोठे शहर आहे.
बर्फाच्छादित पर्वतरांगा, लांबलचक समुद्र किनारा, अनेक नद्या व सरोवरे ह्यांमुळे ओरेगनला नैसर्गिक सौंदर्य लाभले आहे. ह्या राज्याचा जवळपास अर्धा भाग जंगलाने व्यापला आहे. ओरेगन हे अमेरिकेमधील सर्वात हरित राज्य मानले जाते.
मोठी शहरे
- पोर्टलंड - ५,८३,७७६
- युजीन - १,५६,१८५
- सेलम - १,५४,६३७
गॅलरी
- ओरेगन स्वागत फलक.
- ट्रिलियम सरोवर.
- ओरेगनमधील प्रमुख रस्ते व महामार्ग.
- ओरेगन राज्य संसद भवन.
- ओरेगनचे प्रतिनिधित्व करणारे २५ सेंट्सचे नाणे.