ओपेक
ओपेकचा ध्वज | |
ओपेकचे सदस्य देश | |
लघुरूप | ओपेक (OPEC) |
---|---|
स्थापना | सप्टेंबर १०, १९६० |
मुख्यालय | व्हियेना, ऑस्ट्रिया |
सदस्यत्व | |
अधिकृत भाषा | इंग्लिश[१] |
संकेतस्थळ | www.opec.org |
पेट्रोलियम निर्यात करणाऱ्या देशांची संघटना किंवा ओपेक (इंग्लिश: Organization of the Petroleum Exporting Countries) हा जगातील पेट्रोलियम उत्पादने निर्यात करणाऱ्या देशांचा उत्पादक संघ (कार्टेल) आहे. अल्जीरिया, ॲंगोला, इक्वेडोर, इराण, इराक, कुवेत, लिबिया, नायजेरिया, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती व व्हेनेझुएला हे देश ओपेकचे सदस्य आहेत. १९६५ सालापासून ओपेकचे मुख्यालय ऑस्ट्रियाची राजधानी व्हियेना येथे स्थित आहे. तेल उत्पादक देशांचा वैयक्तिक व एकत्रित फायदा जपणे हे ओपेकचे ध्येय आहे. तसेच आंतरराष्ट्रीय तेल बाजारात क्रुड तेलाची किंमत नियंत्रित ठेवणे व किंमतीमध्ये अनावश्यक व हानिकारक बदल न होऊ देणे हे काम देखील ओपेक सांभाळते.2019 मध्ये इक्वेडोर हा देश ओपेकमधून बाहेर पडला.त्यामुळे सध्या ओपेकचे ११ सदस्य देश आहेत.ओपेकच्या सदस्य देशाकडुन होणारे तेल उत्पादन हे जगाच्या एकूण तेल उत्पन्नाच्या ४०%येवढे आहे.त्यामध्ये सर्वात जास्त तेल उत्पादन देश सौदी अरेबिया आहे.
३.ओपेक (OPEC) (Organization Of Petroleum Exporting Countries) पेट्रोलियम निर्यात करणार्या राष्ट्रांची संघटना
- प्रस्तावना:
सर्वप्रथम १९४६ मध्ये व्हेनेझुएलाच्या डॉ. जॉन अल्फान्सो या अर्थतज्ञाने ही खनिजतेलाच्या व्यापारासंबंधी एक कल्पना मांडली. व्हेनेझुएला हा दक्षिण अमेरिकेतील एक तेल उत्पादक देश असून याठिकाणी डॉ. अल्फान्सो यांनी असा एक विचार मांडला की, "एखाद्या वस्तूला जागतिक महत्त्व असेल तर त्या वस्तूच्या व्यापारासंबंधी धोरण ठरविण्यासाठी उत्पादक राष्ट्रांनी एकत्र यावे." या विचारावर अनेकवेळा चर्चा झाली. देशाचे व्यापारी करार हे त्या देशातील सर्व वस्तूंबाबत होत असत. डॉ. अल्फान्सो यांच्या सूचनेनुसार एखाद्या संबंधित वस्तूसाठी व्यापारी संघटना निर्माण करण्याची ही कल्पना नवीनच होती.
संदर्भ
- ^ Chapter I, Article 6 of The Statute of the organization of the Petroleum Exporting Countries (as amended)