ओक्लाहोमा
ओक्लाहोमा Oklahoma | |||||||||||
अमेरिका देशाचे राज्य | |||||||||||
| |||||||||||
अधिकृत भाषा | इंग्लिश | ||||||||||
राजधानी | ओक्लाहोमा सिटी | ||||||||||
मोठे शहर | ओक्लाहोमा सिटी | ||||||||||
क्षेत्रफळ | अमेरिकेत २०वा क्रमांक | ||||||||||
- एकूण | १,८१,१९५ किमी² | ||||||||||
- रुंदी | ३७० किमी | ||||||||||
- लांबी | ४८० किमी | ||||||||||
- % पाणी | १.८ | ||||||||||
लोकसंख्या | अमेरिकेत २८वा क्रमांक | ||||||||||
- एकूण | ३७,५१,३५१ (२०१० सालच्या गणनेनुसार) | ||||||||||
- लोकसंख्या घनता | २१.१/किमी² (अमेरिकेत ३६वा क्रमांक) | ||||||||||
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश | १६ नोव्हेंबर १९०७ (४६वा क्रमांक) | ||||||||||
संक्षेप | US-OK | ||||||||||
संकेतस्थळ | www.ok.gov |
ओक्लाहोमा (इंग्लिश: Oklahoma) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या दक्षिण भागात वसलेले ओक्लाहोमा क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील २०वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने २८व्या क्रमांकाचे राज्य आहे. अमेरिकेच्या संघात सामील झालेले ओक्लाहोमा हे ४६वे राज्य आहे.
ओक्लाहोमाच्या उत्तरेला कॅन्सस, पूर्वेला आर्कान्सा, ईशान्येला मिसूरी, वायव्येला कॉलोराडो, नैऋत्येला न्यू मेक्सिको, तर दक्षिणेला टेक्सास ही राज्ये आहेत. ओक्लाहोमाच्या वायव्य भागात पूर्व-पश्चिम धावणारा एक चिंचोळा पट्टा आहे ज्याला स्थानिक भाषेमध्ये ओक्लाहोमा पॅनहॅंडल असे संबोधतात. ओक्लाहोमा सिटी ही ओक्लाहोमाची राजधानी व सर्वात मोठे शहर तर टल्सा हे येथील दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे.
कृषी, खनिज तेल व नैसर्गिक वायू हे येथील मुख्य उद्योग आहेत. दरडोई उत्पन्नाबाबतीत अमेरिकेत ओक्लाहोमाचा उच्च क्रमांक आहे.
गॅलरी
- ओक्लाहोमा पॅनहॅंडलमधील एक स्वागत फलक.
- ओक्लाहोमाच्या गवताळ प्रदेशामध्ये बायसन मोठ्या प्रमाणावर आढळतात.
- ओक्लाहोमामधील प्रमुख रस्ते व महामार्ग.
- ओक्लाहोमा राज्य संसद भवन
- ओक्लाहोमाचे प्रतिनिधित्व करणारे २५ सेंट्सचे नाणे