ऑस्ट्रो-आशियन भाषासमूह
ऑस्ट्रो-आशियन हे जगातील एक प्रमुख भाषाकुळ आहे. ह्या समूहामधील भाषा दक्षिण व आग्नेय आशियामध्ये वापरल्या जातात. एथ्नॅलॉगनुसार ऑस्ट्रो-आशियन भाषासमूहामध्ये एकूण १६८ भाषांचा समावेश होतो परंतु ह्यांमधील बहुतेक सर्व भाषा अल्पसंख्य असून केवळ व्हियेतनामी (व्हियेतनाम) व ख्मेर (कंबोडिया) भाषांना अधिकृत दर्जा आहे.
सर्व ऑस्ट्रो-आशियन भाषिकांचे मूळ भारत देशाच्या ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यामध्ये आहे असे मानले जाते. येथून आग्नेय आशियामध्ये स्थलांतरित झालेले लोक ऑस्ट्रो-आशियन भाषा वापरतात.
प्रमुख भाषा
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत