ऑस्ट्रोनेशियन भाषासमूह
ऑस्ट्रोनेशियन हे जगामधील एक प्रमुख भाषाकुळ आहे. ह्या समूहामधील भाषा आग्नेय आशियाच्या प्रशांत महासागरामधील अनेक बेटांवर विखुरल्या आहेत. त्याचबरोबर ओशनिया, मादागास्कर व तैवान येथे देखील ह्या भाषा वापरल्या जातात. सध्या ऑस्ट्रोनेशियन भाषा सुमारे ३८ कोटी लोकांद्वारे वापरल्या जातात. ऑस्ट्रोनेशियन भाषांची एकूण संख्या प्रचंड असली तरी त्यातील अनेक भाषांचे फार थोडे वापरकर्ते आहेत.
खालील यादीत ऑस्ट्रोनेशियन भाषांचे प्रमुख उपगट दिले आहेत.
- रुकाई भाषा - तैवान बेटावरील अदिवासी लोकांची भाषा
- पुयुमा भाषा - तैवान बेटावरील अदिवासी लोकांची भाषा
- छोऊ भाषा - तैवान बेटावरील अदिवासी लोकांची भाषा
- मलायो-पॉलिनेशियन भाषासमूह
प्रमुख भाषा
- ४० लाखांहून अधिक स्थानिक भाषिक असलेल्या भाषा
- बासा जावा (7.6 कोटी)
- मलाय / इंडोनेशियन, (4.5 कोटी स्थानिक, ~25.0 कोटी एकूण)
- फिलिपिनो भाषा, (4.7 कोटी स्थानिक,10 कोटी एकूण)
- बासा सुंडा (2.7 कोटी)
- सेबुआनो (1.9 कोटी स्थानिक, ~3.0 कोटी एकूण)
- मालागासी (2.5 कोटी)
- मादुरा (1.4 कोटी)
- इलोकानो (8 दशलक्ष स्थानिक, ~10 दशलक्ष एकूण)
- इलोंगो (7 दशलक्ष स्थानिक, ~11 दशलक्ष एकूण)
- बासा मिनांगकाबाऊ (7 दशलक्ष)
- बटक भाषा (7 दशलक्ष)
- बिकोल भाषा (4.6 दशलक्ष)
- बंजर (4.5 दशलक्ष)
- बाली (4 दशलक्ष)
- अधिकृत भाषा
- कॅरोलिनियन (5,700, उत्तर मेरियाना द्वीपसमूह)
- चामोरो (60,000, गुआम व उत्तर मेरियाना द्वीपसमूह)
- फिजीयन (350,000 स्थानिक, 550,000 एकूण, फिजी)
- फिलिपिनो (4.7 कोटी स्थानिक, ~10 कोटी एकूण, फिलिपिन्स)
- गिल्बर्टी (100,000, किरिबाटी)
- हवाईयन (1,000 स्थानिक, 8,000 प्रभुत्व, हवाई)
- मलाय / इंडोनेशियन, (4.5 कोटी स्थानिक, ~2.5 कोटी एकूण, ब्रुनेई, पूर्व तिमोर, इंडोनेशिया, मलेशिया, व सिंगापूर)
- मालागासी (2.5 कोटी, मादागास्कर)
- माओरी (100,000, न्यूझीलंड)
- मार्शलीज (> 44,000, मार्शल द्वीपसमूह)
- नौरूअन (6,000, नौरू)
- न्युएअन (8,000, न्युए)
- पलाऊअन (15,000, पलाउ)
- रापा नुई (5,000, ईस्टर द्वीप)
- सामोअन (370,000, सामोआ, अमेरिकन सामोआ)
- ताहितीयन (120,000, फ्रेंच पॉलिनेशिया)
- टेटुम (800,000 भाषिक, पूर्व तिमोर)
- टोंगन (108,000, टोंगा)
- तुव्हालूअन (13,000, तुवालू)