ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२०-२१
ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२०-२१ | |||||
न्यू झीलंड महिला | ऑस्ट्रेलिया महिला | ||||
तारीख | २८ मार्च – १० एप्रिल २०२१ | ||||
संघनायक | सोफी डिव्हाइन(१ली म.ट्वेंटी२०) एमी सॅटरथ्वाइट (२री,३री म.ट्वेंटी२०, म.ए.दि.) | मेग लॅनिंग | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया महिला संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | लॉरेन डाउन (१०६) | अलिसा हीली (१५५) | |||
सर्वाधिक बळी | ली कॅस्पेरेक (९) | मेगन शुट (७) | |||
मालिकावीर | मेगन शुट (ऑस्ट्रेलिया) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
सर्वाधिक धावा | आमेलिया केर (५६) | ॲशली गार्डनर (७६) | |||
सर्वाधिक बळी | फ्रान्सेस मॅके (३) जेस केर (३) | जेस जोनासन (३) मेगन शुट (३) |
ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने मार्च-एप्रिल २०२१ दरम्यान तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (महिला वनडे) आणि तीन महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. हा दौरा एक वर्षाने पुढे ढकलेल्या महिला क्रिकेट विश्वचषकाच्या कालावधीत झाला. फेब्रुवारी-मार्च २०२१ मध्ये न्यू झीलंडमध्येच महिला क्रिकेट विश्वचषक नियोजित वेळापत्रकानुसार होणार होता, परंतु कोरोनाव्हायरसच्या संक्रमणाचा धोका लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेनी विश्वचषक स्पर्धा एक वर्ष पुढे ढकलली. त्यामुळे न्यू झीलंड महिला संघाला सराव व्हावा या अनुशंगाने ऑस्ट्रेलिया महिला संघ आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी न्यू झीलंडला आला. महिला ट्वेंटी२० सामने हे न्यू झीलंड पुरुष संघाच्या बांगलादेशविरुद्धच्या ट्वेंटी२० सामन्यांच्या दिवशीच त्याच मैदानात काही तासांच्या अंतराने होणार आहेत. न्यू झीलंडचे नेतृत्व सोफी डिव्हाइन हिने केले तर अनुभवी मेग लॅनिंग हिला ऑस्ट्रेलियाची कर्णधार म्हणून कायम केले गेले.
ऑस्ट्रेलियाने पहिला महिला ट्वेंटी२० सामना सहा गडी राखून जिंकला तर न्यू झीलंडने दुसरा सामना चार गडी राखून जिंकूत मालिका बरोबरीत आणली. तिसरा सामना हा पावसामुळे २.५ षटकांनंतर रद्द करण्यात आल्याने तीन सामन्यांची महिला ट्वेंटी२० मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना जिंकत ऑस्ट्रेलिया महिलांनी सलग २२ एकदिवसीय सामने जिंकण्याच्या विक्रम केला. २००२-०३ दरम्यानच्या रिकी पाँटिंगच्या नेतृत्वात पुरुष संघाच्या २१ अपराजित एकदिवसीय सामन्यांचा विक्रम ऑस्ट्रेलिया महिलांनी मोडला. ऑस्ट्रेलिया महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका ३-० ने जिंकली.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
१ला सामना
२रा सामना
ऑस्ट्रेलिया १२९/४ (२० षटके) | वि | न्यूझीलंड १३१/६ (२० षटके) |
फ्रान्सेस मॅके ४६ (३९) मेगन शुट २/२४ (४ षटके) |
- नाणेफेक : न्यू झीलंड महिला, क्षेत्ररक्षण.
- डार्सी ब्राउन (ऑ) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
३रा सामना
ऑस्ट्रेलिया १४/१ (२.५ षटके) | वि | न्यूझीलंड |
- नाणेफेक : न्यू झीलंड महिला, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे प्रथमत: सामना प्रत्येकी १३-१३ षटकांचा करण्यात आला. परंतु ऑस्ट्रेलियाच्या डावादरम्यान परत आलेल्या पावसामुळे सामना २.५ षटकांनंतर रद्द करण्यात आला.
महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
२रा सामना
ऑस्ट्रेलिया २७१/७ (५० षटके) | वि | न्यूझीलंड २०० (४५ षटके) |
राचेल हेन्स ८७ (१०५) ली कॅस्पेरेक ६/४६ (१० षटके) |
- नाणेफेक : न्यू झीलंड महिला, क्षेत्ररक्षण.
३रा सामना
ऑस्ट्रेलिया १४९/७ (२५ षटके) | वि | न्यूझीलंड १२८/९ (२५ षटके) |
- नाणेफेक : न्यू झीलंड महिला, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना प्रत्येकी २५ षटकांचा करण्यात आला.
- डार्सी ब्राउन (ऑ) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.