ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९४७-४८
ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९४७-४८ | |||||
न्यू झीलंड महिला | ऑस्ट्रेलिया महिला | ||||
तारीख | २० – २३ मार्च १९४८ | ||||
संघनायक | इना लामासन | मॉली डाइव्ह | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया महिला संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | जोआन हॅचर (४४) | उना पेसली (१०८) | |||
सर्वाधिक बळी | जोआन फ्रांसिस (२) फिल ब्लॅक्लर (२) बिली फुलफोर्ड (२) | बेटी विल्सन (१०) |
ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने मार्च १९४८ मध्ये १ महिला कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला होता. ऑस्ट्रेलिया महिलांचा न्यू झीलंडचा हा प्रथम दौरा होता. इना लामासनने यजमान न्यू झीलंड महिलांचे नेतृत्व केले तर पाहुण्या ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व मॉली डाइव्हकडे होते. महिला कसोटी सोबतच ऑस्ट्रेलियाने अनेक स्थानिक महिला क्रिकेट संघांशी सराव सामने खेळले.
एकमेव महिला कसोटी वेलिंग्टन येथील बेसिन रिझर्व मैदानावर खेळविण्यात आली ज्यात ऑस्ट्रेलिया महिलांनी दुबळ्या न्यू झीलंड संघावर १ डाव आणि १०२ धावांनी विजय मिळवला.
महिला कसोटी मालिका
एकमेव महिला कसोटी
२०-२३ मार्च १९४८ धावफलक |
वि | न्यूझीलंड | |
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.
- जोआन हॅचर, बिली फुलफोर्ड, जॉय लामासन, हिल्डा थॉम्पसन, फिल ब्लॅक्लर, उना विकहॅम, जोआन फ्रांसिस, वी फॅरेल (न्यू), जोआन श्मिट, मॉली डाइव्ह नोर्मा व्हाइटमन, थेल्मा मॅककेंझी, मर्टल एडवर्ड्स आणि मर्टल बेलिस (ऑ) या सर्वांनी महिला कसोटी पदार्पण केले.
- ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड महिलांमधील पहिला कसोटी सामना.
- या मैदानावरील पहिली महिला कसोटी.