Jump to content

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२२-२३

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२२–२३
भारत
ऑस्ट्रेलिया
तारीख२० सप्टेंबर २०२२ – मार्च २०२३
संघनायकरोहित शर्माअ‍ॅरन फिंच (ट्वेंटी२०)
कसोटी मालिका
निकालभारत संघाने ४-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावाविराट कोहली (२९७) उस्मान ख्वाजा (३३३)
सर्वाधिक बळीरविचंद्रन आश्विन (२५) नेथन ल्यॉन (२२)
मालिकावीररविचंद्रन आश्विन (भा)
रवींद्र जडेजा(भा)
एकदिवसीय मालिका
निकालऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावालोकेश राहुल (११६) मिचेल मार्श (१९४)
सर्वाधिक बळीमोहम्मद सिराज (५) मिचेल स्टार्क (८)
मालिकावीरमिचेल मार्श (ऑ)
२०-२० मालिका
निकालभारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावासूर्यकुमार यादव (११५) कॅमेरॉन ग्रीन (११८)
सर्वाधिक बळीअक्षर पटेल (८) नेथन एलिस (३)
ॲडम झाम्पा (३)
जॉश हेझलवूड (३)
मालिकावीरअक्षर पटेल (भा)

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने २०२२ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची पूर्वतयारी मालिका म्हणून तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी सप्टेंबर २०२२ मध्ये भारत दौरा केला. व त्यानंतर फेब्रुवारी आणि मार्च २०२३ मध्ये चार कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्याची मलिका खेळण्यासाठी दौरा करणार आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ट्वेंटी२० मालिकेचे वेळापत्रक निश्चित केले.[] ८ डिसेंबर २०२२ रोजी, बीसीसीआयने कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांच्या वेळापत्रकाची पुष्टी केली.[] कसोटी सामने २०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग असतील.[][]

ट्वेंटी२० मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ४ गडी राखून विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.[] ओल्या मैदानामुळे दुसरा सामना प्रत्येकी ८ षटकांचा खेळविण्यात आला आणि भारताने हा सामना ६ गडी राखून जिंकला.[] तिसऱ्या निर्णायक सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ६ गडी राखून विजय मिळवत मालिका २-१ ने जिंकली.[]

१३ फेब्रुवारी २०२३ रोजी, बीसीसीआयने ने पुष्टी केली की तिसऱ्या कसोटीचे ठिकाण धर्मशाला येथून इंदूरला हलवण्यात आले आहे.[]



पथके

कसोटी ट्वेन्टी२०
भारतचा ध्वज भारत[]ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया[१०]भारतचा ध्वज भारत[११]ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया[१२]

मालिका सुरू होण्यापूर्वी, मिचेल मार्श, मिचेल स्टार्क आणि मार्कस स्टोइनिस यांना दुखापतींमुळे संघाबाहेर जावे लागले आणि त्यांच्या जागी शॉन अ‍ॅबॉट, नेथन एलिस आणि डॅनियेल सॅम्स यांना स्थान देण्यात आले होते.[१३] भारताच्या मोहम्मद शमीला कोविड-१९ मुळे टी२० मालिकेतून वगळण्यात आले,[१४] त्याच्या जागी उमेश यादवची निवड करण्यात आली.[१५]

१० जानेवारी २०२३ रोजी, मिचेल स्टार्क बोटाच्या दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीतून बाहेर पडला.[१६] १ फेब्रुवारी २०२३ रोजी, श्रेयस अय्यर पाठीच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीतून बाहेर पडला.[१७] ५ फेब्रुवारी २०२३ रोजी, जोश हेझलवूडला त्याच्या डाव्या पायाला दुखापत झाल्यामुळे भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीतून बाहेर काढण्यात आले.[१८] ७ फेब्रुवारी २०२३ रोजी, कॅमेरॉन ग्रीनला बोट फ्रॅक्चर झाल्यामुळे भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीतून बाहेर काढण्यात आले.[१९] दुसऱ्या कसोटीच्या आधी, मॅथ्यू कुन्हेमन मिचेल स्वेपसनच्या जागी ऑस्ट्रेलियाच्या संघात स्थान देण्यात आले.[२०] १२ फेब्रुवारी २०२३ रोजी, जयदेव उनाडकटला रणजी ट्रॉफी फायनल खेळण्यासाठी दुसऱ्या कसोटीसाठी भारताच्या संघातून मुक्त करण्यात आले.[२१]

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

१ला टी२० सामना

२० सप्टेंबर २०२२
१९:३० (रा)
धावफलक
भारत Flag of भारत
२०८/६ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२११/६ (१९.२ षटके)
हार्दिक पंड्या ७१* (३०)
नेथन एलिस ३/३० (४ षटके )
कॅमेरॉन ग्रीन ६१ (३०)
अक्षर पटेल ३/१७ (४ षटके)
ऑस्ट्रेलिया ४ गडी राखून विजयी.
इंद्रजित सिंह बिंद्रा स्टेडियम, मोहाली
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भा) आणि जयरामन मदनगोपाल (भा)
सामनावीर: कॅमेरॉन ग्रीन (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
  • यापूर्वी सिंगापूरसाठी चौदा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळल्यानंतर टिम डेव्हिडने ऑस्ट्रेलियासाठी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मध्ये पदार्पण केले, आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मध्ये दोन आंतरराष्ट्रीय संघांचे प्रतिनिधित्व करणारा तो सोळावा क्रिकेट खेळाडू बनला.[२२]
  • लोकेश राहुल (भारत) ट्वेंटी२० मध्ये २००० धावा करणारा तिसरा भारतीय ठरला.[२३]
  • हे ऑस्ट्रेलियाचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मध्ये दुसऱ्या क्रमांकाचे यशस्वी धावांचे आव्हान होते.[२४]

२रा टी२० सामना

२३ सप्टेंबर २०२२
२१:३० (रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
९०/५ (८ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
९२/४ (७.२ षटके)
मॅथ्यू वेड ४३* (२०)
अक्षर पटेल २/१३ (२ षटके)
भारत ६ गडी राखून विजयी.
विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नागपूर
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भा) आणि नितीन मेनन (भा)
सामनावीर: रोहित शर्मा (भारत)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
  • ओल्या मैदानामुळे सामना प्रत्येकी ८ षटकांचा खेळविण्यात आला.

३रा टी२० सामना

२५ सप्टेंबर २०२२
१९:३० (रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१८६/७ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१८७/४ (१९.५ षटके)
टिम डेव्हिड ५४ (२७)
अक्षर पटेल ३/३३ (४ षटके)
भारत ६ गडी राखून विजयी.
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, हैदराबाद
पंच: जयरामन मदनगोपाल (भा) आणि नितीन मेनन (भा)
सामनावीर: सूर्यकुमार यादव (भारत)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.


कसोटी मालिका

१ला कसोटी सामना

९-१३ फेब्रुवारी २०२३
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
वि
भारतचा ध्वज भारत
१७७ (६३.५ षटके)
मार्नस लॅबशॅन ४९ (१२३)
रवींद्र जडेजा ५/४७ (२२ षटके)
४०० (१३९.३ षटके)
रोहित शर्मा १२० (२१२)
टॉड मर्फी ७/१२४ (४७ षटके)
९१ (३२.३ षटके)
स्टीव्ह स्मिथ २५* (५१)
रविचंद्रन आश्विन ५/३७ (१२ शतके)
भारत १ डाव आणि १३२ धावांनी विजयी
विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नागपूर
पंच: रिचर्ड इलिंगवर्थ (इं) आणि नितीन मेनन (भा)
सामनावीर: रवींद्र जडेजा (भा)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी
  • के.एस. भरत, सूर्यकुमार यादव (भा) आणि टॉड मर्फी (ऑ) या सर्वांचे कसोटी पदार्पण.
  • टॉड मर्फीचे (ऑ) कसोटीमध्ये पहिल्यांदाच पाच बळी.[२५]
  • रविचंद्रन अश्विन (भा) कसोटी क्रिकेटमध्ये ४५० बळी घेणारा, सामन्यांच्या बाबतीत (८९ कसोटी सामने) दुसरा सर्वात वेगवान गोलंदाज ठरला.[२६] अश्विनने भारतातील त्याच्या २५व्या पाच विकेट्सचा दावा केला, जो भारतातील कोणाकडूनही संयुक्त सर्वोच्च होता (अनिल कुंबळे सह).[२७]
  • ९१ धावा ही ऑस्ट्रेलियाची भारतातील सर्वात कमी कसोटी धावसंख्या होती..[२८]
  • विश्व कसोटी अजिंक्यपद गुण: भारत १२, ऑस्ट्रेलिया ०.


२रा कसोटी सामना

१७-२१ फेब्रुवारी २०२३
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
वि
भारतचा ध्वज भारत
२६३ (७८.४ षटके)
उस्मान खवाजा ८१ (१२५)
मोहम्मद शमी ४/६० (१४.४ षटके)
२६२ (८३.३ षटके)
अक्षर पटेल ७४ (११५)
नेथन ल्यॉन ५/६७ (२९ षटके)
११३ (३१.१ षटके)
ट्रॅव्हिस हेड ४३ (४६)
रवींद्र जाडेजा ७/४२ (१२.१ षटके)
११८/४ (२६.४ षटके)
रोहित शर्मा ३१ (२०)
नेथन ल्यॉन २/४९ (१२ षटके)
भारत ६ गडी राखून विजयी
अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली
पंच: मायकेल गॉफ (इं) आणि (नितीन मेनन) (भा)
सामनावीर: रवींद्र जाडेजा (भा)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी
  • मॅथ्यू कुन्हेमनचे (ऑ) कसोटी पदार्पण.
  • चेतेश्वर पुजाराचा (भा) १००वा कसोटी सामना.[२९] १००व्या कसोटी सामन्यात शून्यावर बाद होणारा तो दुसरा भारतीय ठरला.[३०]
  • ऑस्ट्रेलियाचा फलंदाजीचा डाव सुरु असताना दुखापत झाल्यामुळे डेव्हिड वॉर्नरच्या ऐवजी दुसऱ्या दिवशी मॅट रेनशॉला संघात स्थान दिले गेले.[३१]
  • ७/४२ ही रवींद्र जडेजाची कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी होती.[३२]
  • रविचंद्रन अश्विन आणि नेथन ल्यॉन यांनी अनुक्रमे ऑस्ट्रेलिया आणि भारताविरुद्ध १०० कसोटी बळी पूर्ण केले.[३२][३३]
  • विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (डावाच्या बाबतीत) सर्वात वेगवान २५००० धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला.[३४]
  • विश्व कसोटी अजिंक्यपद गुण: भारत १२, ऑस्ट्रेलिया ०.


३रा कसोटी सामना

१-५ मार्च २०२३
धावफलक
भारत Flag of भारत
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१०९ (३३.२ षटके)
विराट कोहली २२ (५२)
मॅथ्यू कुन्हेमन ५/१६ (९ षटके)
१९७ (७६.३ षटके)
उस्मान ख्वाजा ६० (१४७)
रवींद्र जडेजा ४/७८ (३२ षटके)
१६३ (६०.३ षटके)
चेतेश्वर पुजारा ५९ (१४२)
नेथन ल्यॉन ८/६४ (२३.३ षटके)
७८/१ (१८.५ षटके)
ट्रॅव्हिस हेड ४९* (५३)
रविचंद्रन आश्विन १/४४ (९.५ षटके)
ऑस्ट्रेलिया ९ गडी राखून विजयी
होळकर मैदान, इंदूर
पंच: नितीन मेनन (भा) आणि जोएल विल्सन (वे)
सामनावीर: नेथन ल्यॉन (ऑ)
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी
  • हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुरेशा गवताच्या कमतरतेमुळे आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करण्यास तयार नसल्यामुळे हा सामना धर्मशाला येथून इंदूरला हलवण्यात आला.[३५]
  • मॅथ्यू कुन्हेमन (ऑ) याचे कसोटीत पहिल्यांदाच पाच बळी.[३६]
  • २०१७ नंतर ऑस्ट्रेलियाचा हा भारतातील पहिला कसोटी विजय होता आणि २०२१ नंतर भारतातील कोणत्याही पाहुण्या संघाचा हा पहिला विजय होता.[३७]
  • या सामन्याच्या परिणामी, ऑस्ट्रेलिया २०२१-२०२३ आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम फेरीसाठी पात्र ठरले.[३८]
  • विश्व कसोटी अजिंक्यपद गुण: ऑस्ट्रेलिया १२, भारत ०.

४था सामना

९-१३ मार्च २०२३
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
वि
भारतचा ध्वज भारत
४८० (१६७.२ षटके)
उस्मान ख्वाजा १८० (४२२)
रविचंद्रन आश्विन ६/९१ (४७.२ षटके)
५७१ (१७८.५ षटके)
विराट कोहली १८६ (३६४)
टॉड मर्फी ३/११३ (४५.५ षटके)
१७५/२ घो (७८.१ षटके)
ट्रॅव्हिस हेड ९० (१६३)
अक्षर पटेल १/३६ (१९ षटके)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी
  • कॅमेरॉन ग्रीनचे (ऑ) पहिले कसोटी शतक.[74]
  • रविचंद्रन अश्विन (भारत) ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यांमध्ये सर्वाधिक बळी घेणारा, तसेच नेथन ल्यॉन (ऑ) ला मागे टाकत बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. परंतु त्याच सामन्यात लिऑनने पुन्हा अव्वल स्थान मिळवले.
  • चेतेश्वर पुजारा (भा) कसोटीत एकाच संघाविरुद्ध २,००० धावा करणारा चौथा फलंदाज ठरला.
  • रोहित शर्मा (भारत) यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १७००० वी धाव पूर्ण केली, असे करणारा तो ६वा भारतीय क्रिकेट खेळाडू आहे.
  • विराट कोहली (भा) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३०० झेल घेणारा दुसरा भारतीय ठरला. कोहलीने भारतात ४,००० कसोटी धावाही पूर्ण केल्या आणि ही कामगिरी करणारा तो पाचवा क्रिकेट खेळाडू ठरला.
  • टाकलेल्या चेंडूचा विचार केल्यास अक्षर पटेल हा भारतासाठी पन्नास कसोटी बळी घेणारा सर्वात वेगवान गोलंदाज ठरला. (२२०५ चेंडू)
  • विश्व कसोटी अजिंक्यपद गुण: भारत ४, ऑस्ट्रेलिया ४.


एकदिवसीय मालिका

१ला सामना

१७ मार्च २०२३ (रा)
धावफलक
भारत Flag of भारत
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया

२रा सामना

१९ मार्च २०२३ (रा)
धावफलक
भारत Flag of भारत
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदान, विशाखापट्टणम

३रा सामना

२२ मार्च २०२३ (रा)
धावफलक
भारत Flag of भारत
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई

बाह्यदुवे

संदर्भयादी

  1. ^ "बीसीसीआयतर्फे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध PAYTM होम सीरिजचे वेळापत्रक जाहीर". भारतीय क्रिकेट नियामक मंडळ. २० सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ "बीसीसीआयतर्फे श्रीलंका, न्यू झीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मास्टरकार्ड होम सीरिजचे वेळापत्रक जाहीर". भारतीय क्रिकेट नियामक मंडळ. २८ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ "पहिल्या जागतिक कसोटी स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. २० सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  4. ^ "पुरुषांचा भविष्यातील दौऱ्यांचा कार्यक्रम" (PDF). आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. 2019-07-11 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २० सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  5. ^ "वेड आणि ग्रीनने २०९ धावांचा पाठलाग करताना भारताला थक्क केले". ईएसपीएन क्रिकइन्फो. २६ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  6. ^ "आठ षटकांच्या सामन्यात रोहित आणि अक्षरमुळे भारताला मालिका बरोबरीत आणण्यास मदत". ईएसपीएन क्रिकइन्फो. २६ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  7. ^ "कोहली, सूर्यकुमारने केला शानदार पाठलाग; भारताचा मालिकेत २-१ ने विजय". ईएसपीएन क्रिकइन्फो. २६ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  8. ^ "तिसर्‍या कसोटीचे ठिकाण धर्मशाला येथून इंदूरला हलवण्यात आले". भारतीय क्रिकेट नियामक मंडळ. १३ फेब्रुवारी २०२३ रोजी पाहिले.
  9. ^ "मास्टरकार्ड न्यू झीलंडचा भारत दौरा आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारताचा संघ जाहीर". बीसीसीआय. १३ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
  10. ^ "अनकॅप्ड स्पिनर नेम्ड ऍज ऑस्ट्रेलिया स्वेट ऑन स्टार्क अँड ग्रीन". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १३ फेब्रुवारी २०२३ रोजी पाहिले.
  11. ^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२२, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका टी२० साठी भारताच्या संघांची घोषणा". भारतीय क्रिकेट नियामक मंडळ. २० सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  12. ^ "'मॅच-विनर' डेव्हिडचा ऑसी विश्वचषक संघात प्रवेश". क्रिकेट ऑस्ट्रेलिया. २० सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  13. ^ "भारत दौऱ्यात दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाने महत्त्वाचे त्रिकूट गमावले". www.icc-cricket.com (इंग्रजी भाषेत). २० सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  14. ^ "कोविडमुळे शमी ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० मालिकेतून बाहेर; उमेशची निवड होण्याची शक्यता आहे". क्रिकबझ्झ. २० सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  15. ^ "मोहम्मद शमीची कोविड-१९ चाचणी पॉझिटिव्ह, उमेश यादवची बदली खेळाडू म्हणून निवड". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २० सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  16. ^ "स्टार्क भारताच्या पहिल्या कसोटीतून बाहेर, ऑस्ट्रेलियाच्या १८ सदस्यीय संघात चार फिरकीपटूंची निवड". ईएसपीएन क्रिकइन्फो. १३ फेब्रुवारी २०२३ रोजी पाहिले.
  17. ^ "श्रेयस अय्यर ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या कसोटीतून बाहेर". ईएसपीएन क्रिकइन्फो. १३ फेब्रुवारी २०२३ रोजी पाहिले.
  18. ^ "जोश हेझलवूड भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीला मुकणार". ईएसपीएन क्रिकइन्फो. १३ फेब्रुवारी २०२३ रोजी पाहिले.
  19. ^ "कॅमेरॉन ग्रीन भारताविरुद्ध पहिली कसोटी खेळण्याची शक्यता नाही". ईएसपीएन क्रिकइन्फो. १३ फेब्रुवारी २०२३ रोजी पाहिले.
  20. ^ "'शॉक्ड' कुन्हेमन व्हिस्कड इनटू इंडिया कॅल्क्युलेशन्स". क्रिकेट ऑस्ट्रेलिया. १३ फेब्रुवारी २०२३ रोजी पाहिले.
  21. ^ "जयदेव उनाडकटची रणजी ट्रॉफी फायनल खेळण्यासाठी दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघातून मुक्तता". भारतीय क्रिकेट नियामक मंडळ. १३ फेब्रुवारी २०२३ रोजी पाहिले.
  22. ^ "नोंदी: एकत्रित कसोटी, एकदिवसीय आणि टी२० नोंदी. वैयक्तिक नोंदी (कर्णधार, खेळाडू, पंच), दोन देशांचे प्रतिनिधित्व". ईएसपीएन क्रिकइन्फो. २१ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  23. ^ "मोहालीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या धडाकेबाज खेळीदरम्यान केएल राहुल आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वात जलद २००० धावा करणारा तिसरा फलंदाज ठरला - स्पोर्ट्स न्यूझ". Wion News. २१ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  24. ^ "ऑस्ट्रेलिया आं.टी२० रेकॉर्ड्स - सर्वाधिक यशस्वी धावांचा पाठलाग". [ईएसपीएन क्रिकइन्फो. २१ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  25. ^ "पदार्पण करणारा ऑस्ट्रेलियन टॉड मर्फीचे पाच बळी परंतु नागपुरातील पहिल्या कसोटीत भारत आघाडीवर आहे". एबीसी न्यूझ ऑस्ट्रेलिया. १३ फेब्रुवारी २०२३ रोजी पाहिले.
  26. ^ "भारत वि ऑस्ट्रेलिया: अनिल कुंबळेनंतर ४५० किंवा त्याहून अधिक कसोटी बळी घेणारा आर अश्विन हा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला". इंडियन एक्स्प्रेस. १३ फेब्रुवारी २०२३ रोजी पाहिले.
  27. ^ "बॉर्डर-गावसकर ट्रॉफी: आर अश्विनची घरच्या मैदानावर २५व्यांदा ५ बळी घेत अनिल कुंबळेच्या भारतीय विक्रमाशी बरोबरी". इंडिया टुडे. १३ फेब्रुवारी २०२३ रोजी पाहिले.
  28. ^ "भारत वि ऑस्ट्रेलिया: ऑस्ट्रेलिया सर्वबाद ९१, भारताविरुद्ध भारतातील सर्वात कमी कसोटी धावसंख्येची नोंद". स्पोर्टस्टार. १३ फेब्रुवारी २०२३ रोजी पाहिले.
  29. ^ "पुजारा ॲट १००: टीममेट्स पे हार्टवॉर्मिंग ट्रिब्यूट टू इंडियाज क्रायसिस-मॅन". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १७ फेब्रुवारी २०२३ रोजी पाहिले.
  30. ^ "१००व्या कसोटीत शून्य धावा करणारा पुजारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला". द स्टॅट्समॅन. १९ फेब्रुवारी २०२३ रोजी पाहिले.
  31. ^ "दुखावल्यामुळे वॉर्नर बाद, त्याची जागा रेनशॉने घेतली". ईएसपीएन क्रिकइन्फो. १८ फेब्रुवारी २०२३ रोजी पाहिले.
  32. ^ a b "भारताला अव्वल स्थानावर आणताना रवींद्र जडेजाची दिल्ली कसोटीत कारकिर्दीमधील सर्वोत्तम गोलंदाजी". टाइम्स ऑफ इंडिया. १९ फेब्रुवारी २०२३ रोजी पाहिले.
  33. ^ "रविचंद्रन अश्विन ऑस्ट्रेलियाविरुद्ध १०० कसोटी बळी घेणारा दुसरा भारतीय ठरला". न्यूझ१८. १९ फेब्रुवारी २०२३ रोजी पाहिले.
  34. ^ "नॅथन लियॉनचा भारताविरुद्ध अविश्वसनीय विक्रम, १०० विकेट्स आणि ८व्या 5 विकेट्सची नोंद". इंडिया टुडे. १९ फेब्रुवारी २०२३ रोजी पाहिले.
  35. ^ "भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरी कसोटी धर्मशाला येथून इंदूरला हलवण्यात आली". ईएसपीएन क्रिकइन्फो. ९ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  36. ^ "फिरकीविरुद्ध भारत कोसळल्यानंतर ख्वाजाने ऑस्ट्रेलियाला आघाडी मिळवून दिली". ईएसपीएन क्रिकइन्फो. ९ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  37. ^ "आकडेवारी: भारतासाठी एक दुर्मिळ घरचा पराभव, पंचांसाठी विसरता येणारी कसोटी". ईएसपीएन क्रिकइन्फो. ९ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  38. ^ "ऑस्ट्रेलियाचा यशस्वी पाठलाग, ट्रॅव्हिस हेडचे प्रभारी नेतृत्व". ईएसपीएन क्रिकइन्फो. ९ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.


ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे भारत दौरे
१९५६-५७ | १९५९-६० | १९६४-६५ | १९६९-७० | १९७९-८० | १९८४-८५ | १९८६-८७ | १९९६-९७ | १९९७-९८
२००१ | २००४ | २००७ | २००८ | २००९ | २०१० | २०१३ | २०१३-१४ | २०१६-१७ | २०१७-१८ | २०१८-१९ | २०१९-२० | २०२२-२३