Jump to content

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०२१-२२

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०२१-२२
पाकिस्तान
ऑस्ट्रेलिया
तारीख४ मार्च – ५ एप्रिल २०२२
संघनायकबाबर आझमपॅट कमिन्स (कसोटी)
ॲरन फिंच (ए.दि., ट्वेंटी२०)
कसोटी मालिका
निकालऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावाअब्दुल्ला शफिक (३९७) उस्मान ख्वाजा (४९६)
सर्वाधिक बळीशहीन अफ्रिदी (९)
नौमन अली (९)
पॅट कमिन्स (१२)
नॅथन ल्यॉन (१२)
मालिकावीरउस्मान ख्वाजा (ऑस्ट्रेलिया)
एकदिवसीय मालिका
निकालपाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावाइमाम उल हक (२९८) बेन मॅकडरमॉट (१९५)
सर्वाधिक बळीशहीन अफ्रिदी (६) ॲडम झम्पा (६)
मालिकावीरबाबर आझम (पाकिस्तान)
२०-२० मालिका
निकालऑस्ट्रेलिया संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावाबाबर आझम (६६) ॲरन फिंच (५५)
सर्वाधिक बळीशहीन अफ्रिदी (२)
उस्मान कादिर (२)
मोहम्मद वसिम (२)
नेथन एलिस (४)

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने मार्च-एप्रिल २०२२ तीन कसोटी सामने, तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) आणि एक आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. कसोटी मालिका २०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेंतर्गत खेळविण्यात आली आणि आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळविण्यात आली. ऑस्ट्रेलियाने १९९८ नंतर पहिल्यांदाच पाकिस्तानचा दौरा केला. ही मालिका पहिलीच अशी मालिका होती जेव्हा दोन्ही संघ बेनॉ-कादिर चषकासाठी खेळले.

नोव्हेंबर २०२१ मध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दौऱ्याची पुष्टी केली. ४ फेब्रुवारी २०२२ रोजी पीसीबीने एकदिवसीय सामने आणि ट्वेंटी२० सामना लाहोरहून रावळपिंडीला हलवले. परंतु पुन्हा काही कारणास्तव एकदिवसीय सामने आणि ट्वेंटी२० सामना रावळपिंडीहून लाहोरला हलवले गेले. अखेरीस २७ फेब्रुवारी २०२२ रोजी, २४ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ द्विपक्षीय मालिका खेळण्यासाठी इस्लामाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे उतरला. रावळपिंडी येथील पहिला कसोटी सामना अनिर्णित सुटला. पाकिस्तानचा इमाम उल हक हा कसोटीच्या दोन्ही डावामध्ये शतक झळकावणारा पाकिस्तानचा दहावा खेळाडू ठरला. दुसरी कसोटी देखील अनिर्णित सुटली. तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटीत ११५ धावांनी विजय मिळवत ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांची कसोटी मालिका १-० ने जिंकली. पाकिस्तानी भूमीवर १९९८ नंतर प्रथमच ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका जिंकली. मध्यंतरीच्या काळात ऑस्ट्रेलियाने २००२ साली तटस्थ ठिकाणी पाकिस्तानचा कसोटी मालिकेत पराभूत केले होते. पाकिस्तानने एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली. एकमेव ट्वेंटी२० सामन्यात पाकिस्तानचा ३ गडी राखून पराभव करीत ऑस्ट्रेलियाने दौऱ्याची विजयी सांगता केली.

१ली कसोटी

पाकिस्तान Flag of पाकिस्तान
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
४७६/४घो (१६२ षटके)
अझहर अली १८५ (३६१)
मार्नस लेबसचग्ने १/५३ (१२ षटके)
४५९ (१४०.१ षटके)
उस्मान ख्वाजा ९७ (१५९)
नौमन अली ६/१०७ (३८.१ षटके)
२५२/० (७७ षटके)
अब्दुल्ला शफिक १३६* (२४२)
सामना अनिर्णित.
रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
पंच: अलीम दर (पाक) आणि अहसान रझा (पाक)
सामनावीर: इमाम उल हक (पाकिस्तान)


२री कसोटी

ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
५५६/९घो (१८९ षटके)
उस्मान ख्वाजा १६० (३६९)
फहीम अशरफ २/५५ (२१ षटके)
१४८ (५३ षटके)
बाबर आझम ३६ (७९)‌
मिचेल स्टार्क ३/२९ (१३ षटके)
९७/२घो (२२.३ षटके)
उस्मान ख्वाजा ४४* (७०)
शहीन अफ्रिदी १/२१ (६.३ षटके)
४४३/७ (१७१.४ षटके)
बाबर आझम १९६ (४२५)
नॅथन ल्यॉन ४/११२ (५५ षटके)
सामना अनिर्णित.
नॅशनल स्टेडियम, कराची
पंच: अलीम दर (पाक) आणि अहसान रझा (पाक)
सामनावीर: बाबर आझम (पाकिस्तान)


३री कसोटी

ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
३९१ (१३३.३ षटके)
उस्मान ख्वाजा ९१ (२१९)
नसीम शाह ४/५८ (३१ षटके)
२६८ (११६.४ षटके)
अब्दुल्ला शफिक ८१ (२२८)
पॅट कमिन्स ५/५६ (२४ षटके)
२२७/३घो (६० षटके)
उस्मान ख्वाजा १०४* (१७८)
नसीम शाह १/२३ (१२ षटके)
२३५ (९२.१ षटके)‌
इमाम उल हक ७० (१९९)
नॅथन ल्यॉन ५/८३ (३७ षटके)
ऑस्ट्रेलिया ११५ धावांनी विजयी.
गद्दाफी स्टेडियम, लाहोर
पंच: अलीम दर (पाक) आणि अहसान रझा (पाक)
सामनावीर: पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया)


२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

१ला सामना

विश्वचषक सुपर लीग
२९ मार्च २०२२
१५:०० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
३१३/७ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२२५ (४५.२ षटके)
ट्रॅव्हिस हेड १०१ (७२)
हॅरीस रौफ २/४४ (८ षटके)
इमाम उल हक १०३ (९६)
ॲडम झम्पा ४/३८ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ८८ धावांनी विजयी.
गद्दाफी स्टेडियम, लाहोर
पंच: अलीम दर (पाक) आणि आसिफ याकूब (पाक)
सामनावीर: ट्रॅव्हिस हेड (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
  • झाहिद महमूद, मोहम्मद वसिम (पाक), नेथन एलिस आणि मिचेल स्वेपसन (ऑ) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • विश्वचषक सुपर लीग गुण : ऑस्ट्रेलिया - १०, पाकिस्तान - ०.


२रा सामना

विश्वचषक सुपर लीग
३१ मार्च २०२२
१५:०० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
३४८/८ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
३४९/४ (४९ षटके)
बेन मॅकडरमॉट १०४ (१०८)
शहीन अफ्रिदी ४/६३ (१० षटके)
बाबर आझम ११४ (८३)
ॲडम झम्पा २/७१ (१० षटके)
पाकिस्तान ६ गडी राखून विजयी.
गद्दाफी स्टेडियम, लाहोर
पंच: अलीम दर (पाक) आणि अहसान रझा (पाक)
सामनावीर: बाबर आझम (पाकिस्तान)
  • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
  • विश्वचषक सुपर लीग गुण : पाकिस्तान - १०, ऑस्ट्रेलिया - ०.


३रा सामना

विश्वचषक सुपर लीग
२ एप्रिल २०२२
१५:०० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२१० (४१.५ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२१४/१ (३७.५ षटके)
ॲलेक्स कॅरे ५६ (६१)
हॅरीस रौफ ३/३९ (८.५ षटके)
बाबर आझम १०५* (११५)
नेथन एलिस १/३८ (६ षटके)
पाकिस्तान ९ गडी राखून विजयी.
गद्दाफी स्टेडियम, लाहोर
पंच: अलीम दर (पाक) आणि रशीद रियाझ (पाक)
सामनावीर: बाबर आझम (पाकिस्तान)
  • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
  • विश्वचषक सुपर लीग गुण : पाकिस्तान - १०, ऑस्ट्रेलिया - ०.


आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

एकमेव आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना

५ एप्रिल २०२२
२०:३० (रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१६२/८ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१६३/७ (१९.१ षटके)
बाबर आझम ६६ (४६)
नेथन एलिस ४/२८ (४ षटके)
ॲरन फिंच ५५ (४५)
शहीन अफ्रिदी २/२१ (४ षटके)
ऑस्ट्रेलिया ३ गडी राखून विजयी.
गद्दाफी स्टेडियम, लाहोर
पंच: अलीम दर (पाक) आणि अहसान रझा (पाक)
सामनावीर: ॲरन फिंच (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
  • ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
  • बेन ड्वॉरशियस, कॅमेरॉन ग्रीन आणि मार्नस लेबसचग्ने (ऑ) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.