Jump to content

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१६-१७

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१६-१७
न्यू झीलंड
ऑस्ट्रेलिया
तारीख३० जानेवारी – ५ फेब्रुवारी २०१७
संघनायककेन विल्यमसनअ‍ॅरन फिंच
एकदिवसीय मालिका
निकालन्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावारॉस टेलर (१२३) मार्कस स्टोइनिस (१८८)
सर्वाधिक बळीट्रेंट बोल्ट (८) जेम्स फॉकनर (४)
मिचेल स्टार्क (४)

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने जानेवारी आणि फेब्रुवारी २०१७ दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी न्यू झीलंडचा दौरा केला.[][]

पाकिस्तान विरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात घोट्याला झालेल्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला मालिकेमधून वगळण्यात आले.[] त्याच्याऐवजी मॅथ्यू वेडकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आणि सॅम हेझलेटची स्मिथऐवजी संघात निवड करण्यात आली.[] परंतु पहिल्या सामन्यात पाठीच्या दुखण्यामुळे वेडला संघातून वगळण्यात आले. आणि कर्णधारपदाची धुरा आरोन फिंचकडे सोपवण्यात आली.[] त्यानंतर दुसऱ्या सामन्याआधी वेडला संपूर्ण मालिकेतून वगळण्यात आले आणि उर्वरित सामन्यांमध्ये फिंचने नेतृत्व चालू ठेवले.[]

न्यू झीलंडने मालिका २-० ने जिंकून चॅपेल-हॅडली चषकावर पुन्हा हक्क प्रस्थापित केला.[]

संघ

न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड[]ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया[]
  • हॅमस्ट्रींगच्या समस्येमुळे मार्टिन गुप्टिलला वगळून त्याच्या ऐवजी डीन ब्राउनलीचा सामावेश करण्यात आला.[१०]
  • अंतिम एकदिवसीय सामन्यासाठी टॉम ब्लंडेल ऐवजी इश सोढीची संघात निवड.[११]
  • हॅमस्ट्रींग दुखापतीतून तंदुरुस्त न झाल्याने गुप्टिलला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातून सुद्धा वगळले गेले.[१२]

एकदिवसीय मालिका

१ला सामना

३० जानेवारी २०१७
११:००
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२८६/९ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२८० (४७ षटके)
नेल ब्रूम ७३ (७५)
मार्कस स्टोइनिस ३/४९ (१० षटके)
मार्कस स्टोइनिस १४६* (११७)
मिचेल सॅंटनर ३/४४ (१० षटके)
न्यू झीलंड ६ धावांनी विजयी
इडन पार्क, ऑकलंड
पंच: वेन नाईट्स (न्यू) आणि रूचिरा पल्लियागुरूगे (श्री)
सामनावीर: मार्कस स्टोइनिस (ऑ)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी
  • आंतरराष्ट्रीूय एकदिवसीय पदार्पण: सॅम हेझलेट (ऑ)
  • पाठीच्या तक्रारीमुळे मॅथ्यू वेड ऐवजी अ‍ॅरन फिंचचा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार म्हणून पहिलाच सामना.[१३]
  • एकदिवसीय सामन्यामध्ये मार्कस स्टोइनिसचा (ऑ) पहिला बळी आणि पहिले शतक.[१४] एका सामन्यात एका शतकासह तीन गडी बाद करणारा तो ऑस्ट्रेलियाचा पहिलाच खेळाडू.[१५]
  • पॅट कमिन्सचे (ऑ) ५० एकदिवसीय बळी पूर्ण.[१४]


२रा सामना

२ फेब्रुवारी २०१७
१४:०० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
सामना रद्द
मॅकलीन पार्क, नेपियर
पंच: ख्रिस ब्राऊन (न्यू) आणि कुमार धर्मसेना (श्री)
  • पावसामुळे एकही चेंडू न खेळवता सामना रद्द.


३रा सामना

५ फेब्रुवारी २०१७
१४:०० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२८१/९ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२५७ (४७ षटके)
रॉस टेलर १०७ (१०१)
जेम्स फॉकनर ३/५९ (९ षटके)
आरोन फिंच ५६ (६४)
ट्रेंट बोल्ट ६/३३ (१० षटके)
न्यू झीलंड २४ धावांनी विजयी
सेडन पार्क, हॅमिल्टन
पंच: ख्रिस ब्राऊन (न्यू) आणि रुचिरा पल्लियागुरूगे (श्री)
सामनावीर: ट्रेंट बोल्ट (न्यू)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी
  • रॉस टेलरची नेथन ॲस्टलच्या न्यू झीलंड फलंदाजातर्फे सर्वाधिक एकदिवसीय शतकांच्या विक्रमाशी बरोबरी(१६).[१६]
  • ट्रेंट बोल्टने त्याची एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदवली.[१६]


संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "इंग्लंड विरुद्ध २०१८ मधील दिवस-रात्र कसोटीसाठी इडन पार्क सज्ज". स्टफ.को.एनझेड (इंग्रजी भाषेत). २७ मे २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ "इंग्लंड विरुद्ध २०१८ मध्ये इडन पार्कवर दिवस-रात्र कसोटीचे न्यू झीलंडचे लक्ष्य". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २७ मे २०१६ रोजी पाहिले.
  3. ^ "न्यू झीलंड दौर्‍यातून स्मिथला वगळले, वेड कर्णधार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  4. ^ "ऑस्ट्रेलिया संघाच्या कर्णधारपदी वेड". क्रिकेट ऑस्ट्रेलिया (इंग्रजी भाषेत). ६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  5. ^ "सोअर वेड अनसर्टन फॉर नेपियर ओडीआय". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  6. ^ "वेडला चॅपेल-हॅडली चषकामधून वगळले". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  7. ^ "टेलर, बोल्टच्या खेळीमुळे न्यू झीलंडचा २-० ने मालिकाविजय". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). ६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  8. ^ "चॅपेल-हॅडली चषक एकदिवसीय मालिकासाठी ब्लंडेल न्यू झीलंड संघात सामिल". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३० जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  9. ^ "चॅपेल-हॅडली दौर्‍यासाठी वॉर्नरला विश्रांती". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३० जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  10. ^ "गुप्टिलला दुसर्‍या एकदिवसीय सामन्यातून वगळले". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  11. ^ "हॅमिल्टन एकदिवसीय सामन्यासाठी सोढीला पुन्हा बोलावले". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  12. ^ "गुप्टिल रुल्ड आऊट ॲज न्यू झीलंड एम्स टू रिगेन ट्रॉफी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  13. ^ "नेपियर एकदिवसीय सामन्यात वेडचा सहभाग अनिश्चित". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३० जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  14. ^ a b "ऑस्ट्रेलियाचा न्यू झीलंड दौरा, १ला ए.दि.: न्यू झीलंड वि ऑस्ट्रेलिया, ऑकलंड, ३० जानेवारी २०१७". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३० जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  15. ^ "आकडेवारी / स्टॅट्सगुरु / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय / अष्टपैलू नोंदी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३० जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  16. ^ a b "घरच्या मैदानावर न्यू झीलंडचा सलग आठवा विजय". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.

बाह्य दुवे